सुखविंदर सिंगला ऐकण्यासाठी गर्दीचा उच्चांक

24 Jan 2025 22:10:36
नागपूर /रामटेक,
Ramtek Tourism and Cultural Festival : सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘चल छैया छैया' या गीतावर रामटेककर आज पूर्ण जोमात थिरकले. ‘ताल' चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘रमता जोगी' कुरुक्षेत्रमधील ‘बनठण चली देखो' या त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यावर तरुणाईने ठेका धरला. सुखविंदर सिंगला ऐकण्‍यासाठी रसिकांच्‍या आज उच्‍चांक गाठला.
 
 
SUKHVINDAR-1
 
पर्यटन संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक मध्ये सलग तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव मध्ये स्‍थानिक कलावंत तसेच, राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांच्या सादरीकरणाची मेजवानी रामटेक वासियांना मिळाली. शुक्रवारी सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट'ने या महोत्सवाचा शानदार समारोप झाला. कार्यक्रमाला राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, माजी खासदार कृपाल तुमाने, अभिनेते सोनू सुद उपस्थित होते.
 
 
 

DAKSH-KHANTE
 
दक्ष खंते व अमन कबीर यांचा सत्‍कार
 
जगातील सर्वात युवा आयर्न मॅन म्हणून नुकताच किताब पटकावलेला दक्ष खंतेचा यंदा रामटेकच्या महोत्सवात आशिष जयस्वाल आणि सोनू सूद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच, लेखक, कवी, नाटककार अमन कबीर यांचा देखील सत्‍कार करण्‍यात आला. रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. संचालन श्यामल देशमुख आणि अनुजा गाडगे यांनी केले.
 
 

SONU-SUD
 
जनतेचा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' सोनू सूद
 
अ‍ॅड आशिष जयस्वाल यांचे मित्र अभिनेते सोनू सुदचे मंचावर आगमन होताच एकच जल्लोष झाला. पंजाबमधून शिकण्यासाठी नागपुरात आलेल्या सोनुने दोघांच्या ३६ वर्षे जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. आशिष जयस्वाल यांच्यासोबत नागपूरच्या धरमपेठमध्ये कट्ट्यावर बसल्याच्या आणि रामटेकमध्ये एकत्र बाईकवर किरल्याच्या आठवणी अभिनेते सोनू सूद यांनी महोत्सवाच्या मंचावरून व्यक्त केल्या. विविध सामाजिक कामांमध्ये सक्रिय असलेल्‍या सोनू सूद यांनी रामटेकरांसाठीदेखील कायम
 
रामटेक महोत्सवासाठी कायमस्‍वरूपी तरतूद - अ‍ॅड. आशिष जयस्वाल
 
 
रामटेक मध्ये अनेकदा कालिदास महोत्सव आयोजित केले. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला. मागील वर्षीपासून सुरू झालेल्या रामटेक महोत्सवाला देखील आपण डोक्यावर घेतले, त्याबद्दल आपला आभारी आहे, असे सांगत राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी या महोत्सवासाठी अर्थसंकल्पामध्ये कायमस्‍वरूपी तरतूद करून ठेवणार असल्‍याचे सांगितले.
Powered By Sangraha 9.0