‘त्या’ जन्म, प्रमाणपत्राची एसआयटी चौकशी

    दिनांक :25-Jan-2025
Total Views |
- महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर रडारवर
 
मुंबई, 
Bangladeshi infiltrators in Maharashtra : जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या वितरणातील विलंबासंदर्भात राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. उशिराने देण्यात आलेली जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तसेच त्यासाठी करण्यात आलेले अर्ज बांगलादेशी घुसखोरांची असू शकतात, असा संशय आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गृह विभागाकडून विशेष पथक अर्थात् एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
 
 
Bangladeshi
 
पुढील आदेशापर्यंत उशिराने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यास शासनाने मनाई केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले की, विलंबाने देण्यात आलेल्या जन्म, मृत्यू प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या नेतृत्वात एसआयटी गठित करण्यात आली. व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूनंतर वर्षभरात स्वराज्य संस्थांकडून त्याचे प्रमाणपत्र मिळविता येते. मात्र, या मुदतीनंतर तसे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना नाहीत. जिल्हाधिकार्‍यांनी हे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना, तर काही ठिकाणी तहसीलदारांना दिले आहेत. त्यांच्याकडून खातरजमा करून हे प्रमाणपत्र वितरित केले जातात. मात्र, या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी आल्या. यात बांगलादेशी नागरिक अशा पद्धतीने प्रमाणपत्र येथे वास्तव्य करीत असल्याचा उल्लेख आहे. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली.
 
अकोला, यवतमाळात सर्वाधिक अर्ज
Bangladeshi infiltrators in Maharashtra : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी दावा केला की, जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ दरम्यान यवतमाळमध्ये ११,८८४, अकोल्यात १५,८४५ आणि नागपुरात ४,३५० जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांसाठी विलंबाने अर्ज करण्यात आले. तर याच काळात अकोला शहरातील उपविभागीय अधिकार्‍याने २६९ तसेच तहसीदारांनी ४,८४९ प्रमाणपत्रे वितरित केली. राज्यात दोन लाख बांगलादेशी घुसखोरांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहे.

उशिराने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या. त्याची चौकशी केली जाईल. त्यात प्राप्त झालेल्या अर्जाचा समावेश राहणार आहे.
 
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री