देवळी,
Bhagyashree Fund : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या रोमहर्षक लढतीत पुणे शहराच्या भाग्यश्री फंडने आपली प्रतिस्पर्धी मल्ल कोल्हापूरच्या अमृता पुजारीला ४-२ गुनाने धोबीपछाड देत महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकवला.
महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख ३१ हजार बक्षीस देण्यात आले.अत्यंत चुरशीच्या लढतीचा परिसरातील ४ हजार नागरिकांनी आनंद घेतला.