मुंबई,
Digital India Sale : भारतातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक सेल डिजिटल इंडिया सेल या नावाने परत आला आहे. यात इलेक्ट्रॉनिक्सच्या मोठ्या श्रेणीवर मिळणार नाही, अशी सूट मिळत आहे. इथे ग्राहकांना मोठ्या बँकांच्या कार्ड्सवर २६ हजार रुपयांपर्यंत तत्काळ सूट मिळणार आहे, अशी घोषणा रिलायन्स डिजिटलने केली.
ही ऑफर रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्सवर आणि रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्टोअरमध्ये ग्राहकांना फायनान्सचे अनेक पर्याय मिळतील. कंझुमर ड्युरेबल लोन्सवर २६ हजार रुपयांपर्यंत मिळेल. ग्राहकांना यूपीआय वापरताना अॅक्सेसरीज आणि छोट्या अप्लायन्सेसवर एक हजारपर्यंत सूटचा आनंद घेता येईल. हा डिजिटल इंडिया सेल २६ जानेवारीपर्यंत देशभर लाईव्ह आहे.
Digital India Sale : लॅपटॉप शोधणारे ग्राहक २६,९९९ रुपयांपासून सुरू होणारी वर्क अॅण्ड लर्न आय३ श्रेणी, ४७,५९९ रुपयांपासून सुरू होणारी क्रिएटर कोअर आय५एच श्रेणी आणि ४९,९९९ रुपयांपासून सुरू होणारी गेमिंग ३०५० रेंज यामधून त्यांची निवड करू शकतात. छोट्या पडद्यावरील आश्चर्य असलेल्या सॅमसंग टॅब्लेट ए९+ ची सुरुवात १०,९९९ रुपयांपासून आहे. फ्लिप फोनचे चाहते मोटोरोला राझर ५० अल्ट्रा १२जीबी/ ५१२जीबी हा ‘२०२४ चासर्वोत्कृष्ट फ्लिप फोन’ असा पुरस्कार मिळालेला फोन फक्त ६९,९९९ रुपयांमध्ये मिळवू शकता. त्यासोबत ९,९९९ किंमतीचे मोटो बड्स+ साऊंड बाय मोफत मिळणार आहेत.
फिटनेस जपणार्यांसाठी अॅपल वॉच सिरीज १० ही ३८,९०० रुपयांमध्ये बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज नंतरची किंमत २४ ते २६ जानेवारीपर्यंत वैध मिळेल. २६,९९० रुपयांपासून सुरू होणार्या १.५ टी ३ स्टार एसी सह उकाड्यावर मात करा.