- रिकी गिल, सौरभ शर्माही महत्त्वाच्या पदांवर
वॉशिंग्टन,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी पत्रकार Kush Desai Deputy Press Secretary कुश देसाई यांची त्यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली. व्हाईट हाऊसने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. याआधी देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेशन २०२४ साठी डेप्युटी कम्युनिकेशन डायरेक्टर आणि आयोवाच्या रिपब्लिकन पक्षाचे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
Kush Desai Deputy Press Secretary : देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल डेप्युटी बॅटलग्राऊंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन्स डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले. ट्रम्प यांनी सर्व सातही बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये विजय मिळवला. देसाई यांच्याकडे राजकीय विषयावर संवाद साधण्याचा व्यापक अनुभव आहे. कुश देसाई यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये रिसर्च अॅनालिस्ट म्हणून रुजू होण्याआधी देसाई यांनी वॉशिंग्टनमधील द डेली कॉलरमध्ये १० महिने रिपोर्टर काम केले. त्यांनी न्यू हॅम्पशायरमधील हॅनोव्हर येथील आयव्ही लीग रिसर्च युनिर्व्हसिटीच्या डार्टमाऊथ कॉलेजमधून कला शाखेतून पदवी शिक्षण घेतले. डार्टमाऊथमध्ये शिकत असताना त्यांना प्रतिष्ठित जेम्स ओ फ्रीडमन प्रेसिडेन्शियल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती. त्यांचे इंग्रजी आणि गुजराथी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे.
भारतीय वंशाचे तिघे महत्त्वाच्या पदांवर
Kush Desai Deputy Press Secretary : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात मूळ भारतीय वंशाच्या तिघांची प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. ट्रम्प प्रशासनात रिकी गिल हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दक्षिण आणि मध्य आशियाशी संबंधित वरिष्ठ संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. सौरभ शर्मा यांची राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे येथील कर्मचारी भरती आणि नियुक्त्यांची जबाबदारी असेल. पॉलिटिकोच्या सौरभ शर्मा यांचा जन्म बंगळूरमध्ये झाला. त्यांनी अमेरिकेच्या मोमेंटचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.