नागपूर,
Padmshree-Dr. Vilas Dangre देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांत गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज केंद्र सरकारने केली. त्यात दै. तरुण भारताचे संचालन करणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशन लि., नागपूर, या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलासजी डांगरे यांचाही समावेश असून, इतर मान्यवरांसह त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Padmshree-Dr. Vilas Dangre डॉ. विलासजी डांगरे हे नामवंत व ज्येष्ठ होमिओपॅथ असून, ते धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांना भीष्म पितामह म्हणून ओळखले जाते. होमिओपॅथीचा उपचार करणाऱ्या किमान तीन पिढ्यांचे अनेक डॉक्टर्स त्यांच्या हातून शिकले आणि घडले. भारतातील अनेक नामांकितांना डॉ. डांगरे यांच्या औषधाने लाभ झाला असून, आजही अनेक व्हीव्हीआयपीज त्यांच्या वैद्यकीय सल्ल्याचा व औषधाचा लाभ घेतात. त्यातील प्रमुख नावांमध्ये प. पू. श्री. बाळासाहेब देवरस (तृतीय सरसंघचालक), हिंदूह्दयसम्राट स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे, स्व. श्रीमती सुषमा स्वराज तसेच विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासारख्या नामवंतांचा समावेश आहे.
Padmshree-Dr. Vilas Dangre नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्षपद गेली दोन दशके डॉ. डांगरे भूषवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली दै. तरुण भारत ने तसेच प्रकाशन संस्थेने भरीव कामगिरी बजावली आहे. दरम्यान, या पुरस्काराची घोषणा होताच श्री नरकेसरी प्रकाशन लि. चे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, रेखा दांडेकर, व्यवस्थापकीय संचालक धनंजय बापट, संचालक मंडळातील मीरा कडबे, आशीष बडगे आणि समीर गौतम यांनी डॉ. डांगरे यांच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट दिली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Padmshree-Dr. Vilas Dangre डॉ. डांगरे यांना प्राप्त झालेल्या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना श्री नरकेसरी प्रकाशन लि. चे प्रबंध संचालक धनंजय बापट म्हणाले, ‘डॉ. डांगरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अद्वितीय असे आहे आणि त्याचा हा बहुमान आहे, याचा आम्हा सर्वांना, विशेषतः श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या संचालक मंडळाला, कर्मचाऱ्यांना अभिमान आहे. आमचे अध्यक्ष म्हणून गेली दोन दशके आम्हाला डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात संस्थेने उत्तम प्रगती साध्य केली आहे. त्यांना मिळालेला पद्मश्रीचा बहुमान हा श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा आणि दै. तरुण भारतचा बहुमान आहे. हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, गर्वाचा क्षण आहे. मी मनापासून डॉ. डांगरे यांचे अभिनंदन करतो.’