नागपूर,
Pt.Bachcharaj Vyas Vidyalaya महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे स्टार प्रकल्पांतर्गत हॅकेथॉन उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर यांच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यातील २१९ प्रतिकृतीं पैकी १०४ प्रतिकृतींची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली होती.त्यात पं .बच्छाराज व्यास विद्यालयाचे विद्यार्थी अर्णव घाटोळे व मुळे यांनी बनविलेली प्रतिकृती सर्वोत्तम ठरली. पं बच्छराज व्यास विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला.त्यांनी बनविलेल्या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली.
या विद्यार्थ्यांना शाळेतील सहायक शिक्षक श्रीकांत आगरकर यांनी मार्गदर्शन केले. Pt.Bachcharaj VyasVidyalayaसंस्थेचेअध्यक्ष गजानन पिलपिले, कार्यवाह ॲड. उपेंद्र जोशी, मुख्याध्यापिका रेणुका खळतकर, उपमुख्याध्यापिका अंजली तिजारे, पर्यवेक्षिका कविता मोहरील यांच्यासह सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:पिनाक दलाल,संपर्क मित्र