मालवाहूच्या धडकेत तीन युवक ठार

*सावंगी (मेघे) बायपास रोडवरील घटना

    दिनांक :25-Jan-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha accident : दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना मालवाहुने धडक दिल्याने दोघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 24 रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास सावंगी (मेघे) बायपास रोडवरील पुलाजवळ घडली.
 

APGHAT 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिश ठाकरे (14) रा. सालोड हिरापूर, अभय चौरसिया (19), वैभव भंडारे (22) दोघेही रा. बोरगाव मेघे दुचाकीने घरी जात होते. सावंगी (मेघे) बायपास रोडवरील पुलाजवळ अचानक मालवाहुने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मालवाहूच्या चालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुचाकी चालक हे अतिवेगाने तसेच रस्त्याच्या मध्यभागातून वाहन चालवित असल्याचे माहिती मालवाहू चालकाने पोलिसांना दिली.