डेटा गोपनीयता का महत्वाची आहे आणि डेटा कसा संरक्षित करायचा, घ्या जाणून

27 Jan 2025 18:42:33
Data Protection Day
दरवर्षी २८ जानेवारी हा दिवस डेटा संरक्षण दिन किंवा डेटा प्रायव्हसी दिन म्हणून साजरा केला जातो. अत्याधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने संपूर्ण जग डिजिटलायझेशनकडे वाटचाल करत आहे. यादरम्यान, आपल्या वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे अत्यधिक महत्वाचे आहे. डेटा संरक्षणाच्या अधिकाराबद्दल आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्याच्या विविध उपायांबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Data Protection Day 
 
डेटा प्रायव्हसी दिन हा युरोपमध्ये डेटा संरक्षण दिन म्हणून देखील ओळखला जातो. Data Protection Day  डेटा गोपनीयता दिन हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. २६ एप्रिल २००६ रोजी युरोप कौन्सिलने २८ जानेवारी रोजी डेटा संरक्षण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. २८ जानेवारी १९८१ रोजी 'कन्व्हेन्शन 108' म्हणून ओळखले जाणारे कौन्सिल ऑफ युरोपचे डेटा प्रोटेक्शन कन्व्हेन्शन या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. म्हणून हा दिवस डेटा संरक्षण दिन किंवा डेटा गोपनीयता दिन म्हणून साजरा केला जातो.
सामान्य व्यक्तीसाठी डेटा संरक्षणाची पहिली पायरी म्हणजे डेटाचा कसा वापर किंवा गैरवापर केला जाऊ शकतो हे जाणून घेणे. इंटरनेटवरील बहुतेक जबाबदार सेवा प्रदाते वैयक्तिक किंवा खाजगी डेटा वापरण्यापूर्वी संमती घेतात. मात्र, अनेकदा नागरिक बारीक मुद्रित असलेल्या अटींकडे आणि माहितीकडे दुर्लक्ष करतात. Data Protection Day बऱ्याचदा सामान्य नागरिक आपल्या वैयक्तिक डेटाच्या वापराचे वर्णन करणाऱ्या अटी आणि शर्तींना न वाचता संमती देतात. हे अगदी चुकीचे आहे.
कुठल्याही व्यक्तीची संकलित केली जाणारी वैयक्तिक माहिती कशी वापरली जाईल आणि ते तुम्हाला सोयीचे आहे की नाही याची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच, संवेदनशील डेटा समजून घेणे आणि ओळखणे महत्वाचे आहे. हा डेटा कधीही कोणत्याही किंमतीवर शेअर केला जाऊ नये. संवेदनशील वैयक्तिक डेटा सामायिक केल्याने संभाव्य सायबर-गुन्हे देखील होऊ शकतात, जसे की ओळख चोरी, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर नुकसान. Data Protection Day हे टाळण्यासाठी वैयक्तिक डेटा वापरण्यासाठी संपूर्ण माहिती वाचल्या आणि समजल्यानंतरच संमती द्यावी.
प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत पासवर्ड वापरावा आणि शक्य असेल तिथे द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम करणे. संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नये. संगणक आणि मोबाईलवर संवेदनशील डेटा एनक्रिप्ट करणे. तुम्ही वापरात असलेल्या सेवांच्या गोपनीयतेच्या धोरणांचे पुनरावलोकन करा आणि तुमचा डेटा कसा संकलित आणि वापरला जातो ते समजून घ्या. या काही उपायांच्या मदतीने डेटा गोपनीय आणि संरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0