नागपूर,
Maruti Chitampally ज्या आनंदाची मी इतकी वर्ष वाट पाहत होतो तो आनंद आज पद्म पुरस्काराच्या रुपाने गवसल्याचा मनापासून आनंद होतोय. ज्या अरण्याची इतकी वर्ष शब्दसेवा केली त्या अरण्याचा हा सन्मान असल्याची अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मराठी Maruti Chitampally साहित्यात निसर्गचित्रणाची हिरवी वाट निर्माण करणारे ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक आणि अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्यातील ललित प्रतिभेने त्यांनी निसर्ग आणि माणूस यांच्यातील शोध घेतला. ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ म्हणूनही गौरविण्यात आले आहे. आयुष्यातील बराच काळ ते नागपुरात वास्तव्यास होते. त्यामुळे नागपूरकराशी त्यांचा स्नेह राहिला आहे.
सोलापुरातील Maruti Chitampally एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.
पुरस्कारांनी आजवर गौरव
१८ भाषा Maruti Chitampally जाणणार्या या वनमहर्षीने भारतातील १६ जंगलांत प्रवास केला आहे. यातून अनुभवलेला समृद्ध असा निसर्ग त्यांनी २१ ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. त्यांना तीन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००६ साली सोलापूर येथे झालेले ७९ व्या भारतीय मराठी साहित्य सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला आहे.