लाेकहितार्थ संस्कारांचा सन्मान

27 Jan 2025 14:53:11
वैभव व्यवहारे
नागपूर,
dr.vilas dangre मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचाे. तेथे मला लाेकाहित करण्याचा संस्कार मिळेला. समाज सेवा करण्याचा संस्कार मिळाला. त्या संस्कारांमुळेच मी घडू शकलाे. त्यामुळे, त्या लाेकहितार्थ संस्कारांचा आज खऱ्या अर्थाने सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया नागपूरचे प्रसिद्ध हाेमिओपॅथ डाॅ. विलास डांगरे यांनी तरुण भारतशी बाेलताना व्यक्त केली.
 
 
dr.vilas
 
 
श्री नरकेसरी dr.vilas dangre प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष प्रसिद्ध हाेमिओपॅथिक तज्ज्ञ डाॅ. विलास डांगरे यांना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार घाेषित करण्यात आला. त्यावर, प्रतिक्रिया देताना डाॅ. डांगरे म्हणाले, ही सर्व संघ मातीची कमाल आहे. मी माझ्या पुरस्काराचे श्रेय संघ संस्कारांना देताे. आपल्याला पद्मश्री घाेषित झाल्याचे कळल्यावर खूप आनंद झाला. आता जबाबदारी वाढली आहे. समाजाची अधिक सेवा करण्याची संधी मिळाली आहे. समाजसेवेशिवाय कुठलिही राष्ट्रसेवा चांगली असू शकत नाही, अशी भावना आपल्या मनात येत आहे. आमच्या चिकित्सा पद्धतीबद्दल माेठे गैरसमज हाेते. फक्त सर्दी, खाेकला दूर हाेताे असा लाेकांचा गैरसमज हाेता. पण या हाेमिओपॅथीच्या चिकित्सा पद्धतीने अनेक आसाध्य आजार बरे हाेऊ शकतात, यावर आज शिक्कामाेर्तब झाला. त्यामुळे, हा पुरस्कार आपण जनता जनार्दनाला समर्पित करत असल्याचे ते म्हणाले.
 
 
 देशातील dr.vilas dangre आणिबाणी संपल्यावर १९८० सालानंतर माझ्या प्रॅक्टीसला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याेगायाेग असा की अगदी सुरुवातीपासूनच मला औषधाेपचारात यश मिळाले. आपण स्वतःवर आणि स्वतःच्या चिकित्सा पद्धतीवर विश्वास ठेवल्याने त्यावर प्रेम केल्याने आपल्याला यश मिळाल्याचे ते म्हणले. आपल्या कुटुंबाबाबत सांगताना ते म्हणाले की, मला माझ्या कुटुंबाने नेहमीच चांगली साथ दिली. माझ्या आईची महत्वाची भूमिका असल्याचे सांगत ते म्हणाले की, माझ्या प्रत्येक कामात आईचा आशीर्वाद सातत्याने पाठिशी राहीला. मी राेज १८ तास काम करायचाे. त्याची शक्ती मला आईकडूनच मिळत हाेती. रुग्ण पहाटे चार वाजल्यापासून नंबर लावायला दवाखान्यात रांगा लावत हाेते. प्रत्येकाला पहिल्या लाॅटमध्ये नंबर लागावा असे वाटत हाेते. त्यावेळीही गरीबातील गरीबाला आपल्या चिकित्सेचा फायदा व्हावा. लाेकांचे दुःख दूर व्हावे, याचाच आपण प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या वतीने संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट तसेच संचालक मीरा कडबे, समीर गाैतम आणि आशिष बडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
  
 
या रुग्णांवर केली चिकित्सा
डाॅ. विलास dr.vilas dangreडांगरे यांनी प. पू. बाळासाहेब देवरस (तृतीय सरसंघचालक), हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, सुषमा स्वराज, लता मंगेशकर, केंंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चाैहान, माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्यावर चिकित्सा केली आहे.
Powered By Sangraha 9.0