यवतमाळ,
Padma Shri Subhash Sharma येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबाेधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच हा सन्मान प्राप्त हाेत आहे. गेल्या ३० वर्षापासून ते नैसर्गिक शेती करीत असून, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. देशभरात हजाराे शेतकरी त्यांच्या प्रेरणेने विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत.

यवतमाळजवळ Padma Shri Subhash Sharma तिवसा येथे त्यांची २० एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयाेगशाळाच आहे. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गाेमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघाेस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांच्या शेतात आजपर्यंत लाखाे शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे. सुभाष शर्मा यांची भारतातील अनेक कृषी विद्यापीठांमध्ये व्याख्याने देखील झाली आहेत. सुभाष शर्मा यांच्या शेतीविषयक प्रयाेगांना हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डाॅ. स्वामिनाथन, भारत सरकारचे अतिरिेक्त सचिव पी. डी. मिश्रा, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी, महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीर गाेयल, समाजसेवक अण्णा हजारे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह भय्याजी जाेशी, तत्कालीन सहसरकार्यवाह भागय्या,अमिरिकेचे राजदूत असदाक के, इंडियन ऑरगॅनिक असाेसिएशनचे क्लाऊड अल्वारीस यांच्यासह देश विदेशातील अनेक तज्ञ आणि मान्यवरांनी भेट दिली आहे.त्यांच्या या अलाैकिक कार्याबद्दल सुभाष शर्मा यांना महाराष्ट्र सरकारचा ‘कृषिभूषण’ अॅग्राेवनचा ‘स्मार्ट शेतकरी’ , दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सेवा’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या Padma Shri Subhash Sharma आत्महत्यांनी गाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष शमारसारख्या कृषी चिंतकास ‘पद्मश्री’सारखा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन भारत सरकारने याेग्य सन्मान केल्याची भावना कृषी क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाष शर्मा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.