नागपूर,
Smart public toilets शौचालयांअभावी नागरिकांची विशेषत: महिलांची होणारी परवड लक्षात घेवून वर्दळीच्या बाजारात, धंतोली सारख्या रुग्णालयाच्या परिसरात मनपाने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. मात्र मेजर सुरेंद्र देव पार्क मध्ये पर्याप्त जागा उपलब्ध असताना नागरिकांची गैरसोय होईल, अशा पध्दतीने शौचालय बांधण्यात आले आहे. यात प्रामुख्याने महिला व एकच अरुंद प्रवेश मार्ग ठेवण्यात आला आहे. प्रसाधनगृहाकरिता दोन बाजूने स्वतंत्र मार्ग देण्याऐवजी एकच मार्ग ठेवण्यात आला आहे. नव्या स्मार्ट प्रसाधनगृहात अधिक जागा मोकळी सोडण्याची गरज असताना कमी जागेत नागरिकांची गैरसोय कशी होईल,याकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून येते.
उद्यानात घाणीचा उग्रवास
धंतोलीच्या सुरेंद्र देव पार्क परिसरात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहाची होत नसल्याने उद्यानात फिरणार्यांना नागरिकांना घाणीचा उग्रवास सहण करावा लागत आहे. Smart public toilets उद्यानातील एक पाण्याचा फवारा गत अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. नागरिकांनी यासंदर्भात मनपाच्या झोन कार्यालयात तक्रार केल्यानंतरही याकडे पूर्णत: कानाडोळा होत आहे.
४४ ठिकाणी ‘स्मार्ट टॉयलेट’
वर्दळी ठिकाणी प्रसाधनगृहाअभावी महिलांची गैरसोय लक्षात घेवून शहरात ४४ ठिकाणी ‘स्मार्ट टॉयलेट’ आले आहे. अनेक ठिकाणी तर मनपाचे जुने सार्वजनिक शौचालय तोडून नव्याने ‘स्मार्ट टॉयलेट’ बांधण्यात आले आहे. तर काही ठिकाणी नव्या जागेत ‘स्मार्ट टॉयलेट’ उभारण्यात आले आहे. Smart public toilets कुठे नागरिकांची सोय तर कुठे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मागणीनंतर वॉकर स्ट्रीट, सिव्हिल लाईन्स येथे ‘स्मार्ट टॉयलेट’ तयार झाले आहे. शहरातील सर्व ठिकाणी नवीन स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधण्यात आल्यानंतर देखभालीकरिता खाजगी संस्थेकडे सोपविण्यात येतील, अशी माहिती मनपाच्या झोन अधिकार्यांनी दिली आहे.
टॉयलेटच्या वापरासाठी शुल्क लागणार
स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले आहे. यात काही ठिकाणी हँड ड्रायरची सोय करण्यात आली आहे. Smart public toilets स्मार्ट टॉयलेट तयार झाल्यानंतर आगामी काळात कंपनीची नियुक्ती करुन देखभालीची जबाबदारी सोपविल्या जाणार आहे. यात प्रामुख्याने स्मार्ट टॉयलेटच्या वापरासाठी नागरिकांना ५ ते १० रुपये असे शुल्क द्यावे लागणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकार्यांनी दिली आहे.