वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar : दी महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग ङ्गायनान्स कॉर्पोरेशन लिमी. मुंबई या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या हितासाठी कॉर्पोरेशनला आर्थिक पाठबळ देण्यासोबतच कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यासाठी पाऊले उचलण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सहकार, गृहनिर्माण, गृह ग्रामीण व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत दिले.
दी महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग ङ्गायनान्स कॉपोरेशन लिमी. मुंबई अध्यक्ष वसंत घुईखेडकर, उपाध्यक्ष माजी आ. बाळासाहेब सानप व संचालक मंडळाने सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी दी महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग ङ्गायनान्स कॉपोरेशनच्या अडीअडचणीबाबत चर्चा केली. Dr. Pankaj Bhoyar राज्यातील मध्यवर्गीय अल्प उत्पन्न गट, पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त, कामगार, शेतकरी, भटके व विमुक्त मागासवर्गीय घटकातील नागरिकांच्या स्वप्नातील घर व्हावे, यासाठी वित्त पुरवठा करण्यात येत होता. राज्यातील सहकारी, गृहतारण संस्था व वैयक्तिक सभासदांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणारी राज्यातील एकमेव संस्था होती.
दोन वर्षांंपासून संस्था ङ्गायद्यात आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने कर्ज वाटप बंद आहे. शासनाची हमी मिळण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत शासन सुद्धा सकारात्मक आहे. 1994 पासून कर्मचारी भरती बंद आहे. कामकाज संगणीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत संगणकीय शिक्षित अधिकारी व कर्मचार्यांची गरज भासणार असल्याचे राज्यमंत्री भोयर यांच्या निर्दशनास आणून दिले. Dr. Pankaj Bhoyar कॉपोरेशनला शासन थकहमीवर वित्तीय संस्थांकडून निधी व कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीबाबत सहकार आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन ना. भोयर यांनी दिले. यावेळी संचालक प्रकाश दरेकर, सीताराम राणे, अॅड. दत्तात्रय वडेर, प्रथमेश गिते, डॉ़ सतिश पाटील, विजय मराठे, अॅड. वसंत तोरवने, विश्वास पाटील, वृषाली चव्हाण, प्रभारी कार्यकारी संचालक मनोज शिंदे, प्रभारी सरव्यवस्थापक हनुमंत शिरके आदी उपस्थित होते़