महावितरणचे अ‍ॅप एक, सुविधा अनेक

03 Jan 2025 20:59:33
-सेवा आपल्या बोटांवर

नागपूर, 
Mahavitaran Mobile App महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून केवळ ‘गुगल प्ले’वरून मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्याची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक आहे. शिवाय अ‍ॅपलच्या ‘अ‍ॅप स्टोर्स’ वरूनही लाखोंच्या अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. वीज ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे, वीजचोरीची माहिती देणे अशा विविध सुविधा आपल्या बोटांवर असलेले अ‍ॅप डाऊनलोड करून ते सतत वापरणार्‍या ग्राहकांची संख्या ३५ लाखांपेक्षा अधिक आहे. या अ‍ॅपचा वापर करणार्‍या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
 
 
app
 
Mahavitaran Mobile App : महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपचा करून अनेक सेवा सहजपणे फोनवरून मिळविता येतात. वीज बिलाची नोटिफिकेशन व बिल भरल्याची माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध होते. ग्राहकांना विजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे व आपल्या तक्रारीवर पुढे  कारवाई झाली याची माहिती घेणे अ‍ॅपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अ‍ॅपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे व कसे जायचे, याचीही माहिती अ‍ॅपवरून मिळते. वापरण्यास सहज व सोपे असलेले महावितरणचे हे अ‍ॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या पारदर्शक सोयी हे उत्तम उदाहरण आहे. या अ‍ॅपचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र दोडके केले आहे.
सुविधा एका क्लिकवर
-‘ऊर्जा चॅटबॉट’च्या माध्यमातून अनेक प्रश्नांची तात्काळ उत्तरे
-पहा व भरा
-स्वतः अचुक रीडिंग पाठवणे
-नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज
-वीज वाहिन्यांची माहिती
-नादुरुस्त रोहित्राची माहिती
-वीजचोरी कळविणे
-गो ग्रीन नोंदणी
-पुनर्जोडणी शुल्क भरणे
-सौर कृषी पंप अर्ज सद्यस्थिती
-विजेसंबंधी तक्रार नोंदणी व तक्रार पाठपुरावा क्रमांक/ ई- मेल
-महावितरण ग्राहक सेवेबद्दल अभिप्राय नोंद
-महावितरण कार्यालय व भरणा केंद्रे नकाशा
-मासिक वीज देयकाचा अंदाजित तपशील
-नावात बदल अर्ज
Powered By Sangraha 9.0