बुलढाणा,
Kiran Patil : जिल्हाधिकारी यांनी आपल्या अखत्यारित असणार्या तिन सुट्यापैकी संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगट दिनी शासकीय सुट्टी जाहीर केल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून शेगावला ओळखल्या जाते. राज्यभर संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. शेगाव येथे प्रकट दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. शेगाव संस्थांन आपल्या सामाजिक कार्य आणि शिस्तबद्ध नियोजन यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. यावर्षी संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन दि. 20 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच अक्षय तृतीया 30 एप्रिल, जेष्ठगौरी पुजन 1 सप्टेंबर या दिवशी सुद्धा सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या संबधी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दि. 2 जानेवारी रोजी आदेश पारित केला आहे.