सावित्रीबाई फुले जयंती साजरी

03 Jan 2025 12:44:27
नागपूर,
 Sarojini Public School सरोजिनी पब्लिक स्कूल महादेव नगर, लावा,वाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुषमा निशाने अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या सुषमा निशाने यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धाचें आयोजन करण्यात आले होते.एका मुलीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
  
fule  
 
 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सुंदर अशी नाटिका प्रदर्शित केली.Sarojini Public School कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. अध्यक्षिय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ‎
सौजन्य:संदीप कोहळे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0