माधव नेत्रालय आशेचा किरण

    दिनांक :03-Jan-2025
Total Views |
-शंकरबाबा पापळकर यांचे गौरवोद्गार
-पद्मश्री पुरस्काराबद्दल सत्कार

नागपूर, 
डोळ्यांचे आरोग्य व संशोधन क्षेत्रातील कार्यामुळे माधव नेत्रालय अल्पदृष्टी व अंध रुग्णांना दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असून अशा रुग्णांसाठी हे आशेचा किरण ठरत असल्याचे भावपूर्ण उद्गार Shankar Baba Papalkar पद्मश्री डॉ. पापळकर यांनी काढले. गजानन नगरातील माधव नेत्रालयातर्फे निराधार, मतिमंद व विकलांग मुलांसाठी कार्य करणारे जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माधव नेत्रालयाचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ. संजय जयस्वाल, विश्वस्त संदीप धर्माधिकारी, शिरिश दारव्हेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. धनंजय वैद्य, दत्ता टेकाडे, कुकडे, श्रीनिवास वैद्य, संजय नाथे, माहिती विभागाचे माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दिलीप चौधरी उपस्थित होते.
 
 
Madhav dksl
 
Shankar Baba Papalkar : मध्य भारतात रुग्णांच्या डोळ्यांच्या आरोग्यासोबतच या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात माधव नेत्रालयाचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असून समाजातील गरीब रुग्णांना सुलभ सेवा उपलब्ध होत असल्याचे सांगताना पापळकर यांनी अतिदुर्गम आदिवासी भागातील नेत्र रुग्णांसाठी संस्था काम करत असल्याबद्दल सर्व पदाधिकार्‍यांचे विशेष आभार मानले. नेत्रालयामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सामाजिक भावनेने कार्यरत आहे. मध्य भारतात सेवाभावी वृत्तीने ही संस्था रुग्णसेवा करत आहे. डोळ्यांच्या विविध आजारांसोबतच विविध प्रकारच्या शस्त्रकि‘या अल्प खर्चात उपलब्ध असल्यामुळे एका वर्षात सुमारे ३ हजार ४२७ पेक्षा जास्त शस्त्रकि‘या झाल्या आहेत. या रुग्णालयात सरासरी चार ते पाच हजार रुग्ण प्रत्येक महिन्याला तपासणीसाठी येत असून या वर्षात ४४ हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला असल्याची माहिती डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली. डॉ. वरदा गोखले यांनी शंकरबाबा पापळकर यांची नेत्र तपासणी केली.