गावाचा विचार, जय गुरुदेव!

Wardha-Pankaj Bhoyar-BJP ग्राम स्वराज्य संकल्पनेला चालना

    दिनांक :03-Jan-2025
Total Views |
वेध
 
- प्रफुल्ल व्यास
 
 
 
Wardha-Pankaj Bhoyar-BJP राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला भरभरून दान मिळालं. सरकार स्थापन करण्यासाठी हाेत असलेल्या विलंबाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात हाेते आणि आजही मंत्रिमंडळ स्थापन करायला उशीर का लागला, याची कल्पना आहे का, असा प्रश्न सत्ताधारीच नव्हे, तर विराेधी पक्षातीलही राजकीय तज्ज्ञ विचारतात. पण, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर युवकांचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांनी पेटारा फोडला. Wardha-Pankaj Bhoyar-BJP त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या हाेत्या. राज्यात यावेळी महायुती सरकारमध्ये 50 ते 60 युवा आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी जवळपास 11 तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. (सर्वात तरुण आमदार वराेरा मतदार संघातील करण देवतळे आहेत.) या मंत्रिमंडळात जवळपास सर्वच मंत्री उच्चशिक्षित आणि कल्पक आहेत.
 
 
 

Wardha-Pankaj Bhoyar-BJP 
 
 
 
Wardha-Pankaj Bhoyar-BJP मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिद्वय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विश्वासात घेऊन मंत्रिमंडळ तयार केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी खाते वाटप करण्यात आले. असे म्हणतात, आरंभ शूर शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री फडणवीस अतिशय शांतपणे निर्णय घेत पाच वर्षांच्या कार्यकाळाचे गणित मांडत असतील. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांनी देशात नक्षलवादी जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गडचिराेली जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून ओळख हाेईल, असा विश्वास दिला. Wardha-Pankaj Bhoyar-BJP फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्रीही काही कमी नाहीत. त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत. वर्धेला अनेक वर्षांनंतर आणि भाजपाने पहिले मंत्रिपद दिले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले डाॅ. पंकज भाेयर विदर्भाचे नेते दत्ता मेघे यांच्यासाेबत 12 वर्षांपूर्वी भाजपात आले. आज ते मूळचेच भाजपाचे असल्यासारखे वाटू लागले आहेत. रविवारी त्यांनी दाेन महत्त्वाचे विषय मांडले.
 
 
 
 
Wardha-Pankaj Bhoyar-BJP त्यातला एक विषय त्यांच्याच मंत्रालयासंदर्भात हाेता. त्यामुळे आपले खाते राज्यात अव्वल कसे असेल यासाठी त्यांनी केलेले नियाेजन असेल, असे एकदा आपण म्हणू या! परंतु, दुसरा विषय त्यांनी मांडला ताे राज्याचा, आपल्या नेतृत्वाचा आणि आपण ज्या विचाराच्या पक्षात काम करताे आहे याचे उदाहरणच म्हणावे लागेल. राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर यांनी जी कल्पना मांडली ती पक्षशिस्त आणि आपल्याला मिळालेल्या पदाच्या मर्यादांची जाणीव ठेवली. देशात आपआपल्या समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. परंतु, जातिपाती या चाैकटीच्या बाहेर जात सकल समाजाचा विचार करणाèया दाेन संघटना आहेत. Wardha-Pankaj Bhoyar-BJP त्यात पहिली म्हणजे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि दुसरी ‘गुरुदेव सेवा मंडळ.’ दाेन्ही संघटनांमध्ये स्वयंसेवक व गुरुदेव सेवक नि:स्वार्थपणे कामं करताना दिसतात. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी दिलेल्या संदेशाचे काटेकाेर पालन ही मंडळी डाेक्यावर भगवी टाेपी घालून करताना दिसून येतात. याच गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांमार्फत  राष्ट्रसंतांच्या विचारावर महाराष्ट्रात ग्राम विकासाला चालना देण्याची कल्पना राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर यांनी मांडली.
 
 
 
 
Wardha-Pankaj Bhoyar-BJP गुरुदेव सेवा मंडळ अतिशय प्रामाणिकपणे काम करते. राष्ट्रसंतांना अभिप्रेत समृद्ध म्हणजे स्वावलंबी गावासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या याेजना ‘जय गुरुदेव’च्या माध्यमातून राबवावी. कारण गुरुदेवभक्त अतिशय प्रामाणिक व चिकाटीने काम करतात, ही ना. भाेयर यांची कल्पना प्रत्यक्ष उतरल्यास तुकडाेजी महाराजांच्या ‘ग्राम स्वराज्य’ या संकल्पनेला पुन्हा एकदा चालना मिळायला सुरुवात हाेईल. ग्राम विकास हे आपले मंत्रालय नाही, ही जाणीव ठेवत आपल्या राज्यात आपल्या गुरुदेव भक्तांचा या निमित्ताने सन्मान हाेईल आणि एक माेठी चळवळ या राज्यात उभी हाेईल. Wardha-Pankaj Bhoyar-BJP ना. भाेयर यांनी गेल्या पाच वर्षांत वर्धा विधानसभा मतदार संघात राष्ट्रनेता (पंतप्रधान नरेंद्र माेदी) ते राष्ट्रपिता (महात्मा गांधी) असा सेवा पंधरवडा राबवत शासकीय याेजनांचा जागच्या जागी निपटारा करण्याची माेहीम राबविली. हे अभियान आता राज्यात राबविले जाणार आहे.
 
 
 
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी आपल्या भजनांमधून देशभक्ती गावागावांत पाेहाेचविली. Wardha-Pankaj Bhoyar-BJP खेडी बकाल हाेऊ नये यासाठी शेतकरी गावातच समृद्ध व्हावा, गावाची समृद्धी गावाने राखावी, सरकारने मदत करावी या अर्थाने प्रबाेधन केले आहे. गावात शांतता नांदण्यासाठी गावातील तंटे गावातच मिटावे तसेच खतही तुमचे तसेच बियाणेही तुमचे आदी अनेक ग्राम विकासासाठी याेजना दिल्या. मात्र, ‘ग्राम स्वराज्य’ हा शब्दच काही वर्षांत हद्दपार झाल्याचे दिसून येते. मंत्रिमंडळ कुटुंब असल्याचे समजून गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांच्या माध्यमातून राज्य सरकारने राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांची संकल्पना राबविली तर सरकार वेगळी उंची गाठल्याशिवाय राहणार नाही. Wardha-Pankaj Bhoyar-BJP गावाच्या आशीर्वादाने समृद्ध सरकार झाल्याशिवाय राहणार नाही. जय गुरुदेव...!
9881903765