वाशीम,
registration for Farmer ID : शेती क्षेत्राला प्रगत आणि शाश्वत बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडीसाठी वाशीम जिल्ह्यातून जवळपास १६ हजार पेक्षा जास्त शेतकर्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीक विमा, पीक कर्ज व इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टेक ही योजना १४ ऑटोबर २०२४ पासून राबविण्यास प्रारंभ झाला. प्रायोगीक तत्वावर ही योजना बीड जिल्ह्यात राबविली गेली होती. त्यानंतर ही योजना संपुर्ण राज्यभर राबविल्या जात आहे. वाशीम जिल्ह्याचा विचार केल्यास वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुयात ४७६२, मालेगाव तालुयात १६८७, मंगरुळनाथ तालुकयात २७३९, मानोरा तालुयात १७४६, रिसोड तालुयात २८८३ तर वाशीम तालुयात २५०२ असे १६३१९ शेतकर्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.
अॅग्रीस्टेक योजने अंतर्गत शेतकर्यांनी नागरी सुविधाकेंद्रात जाऊन आपला सात / बारा उतारा, आधार कार्डाशी लिंक व आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करुन व ईतर कागदपत्रे घेत नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी केल्यानंतर शेतकर्याला फार्मर आयडी मिळणार आहे. या फार्मर आयडीमुळे किसान क्रेडीट कार्ड, शेती विकासासाठी आवश्यक असलेले कर्ज, पीकासाठी नुकसान भरपाईचे सर्वेक्षण, मदत वाटप यासाठी या फार्मर आयडी धारकाला मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर याच्या माध्यमातून पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि धोरणे ठरविण्यासाठी, न्युनतम आधारभूत किंमतीवर ऑनलाईन शेतमाल खरेदीसाठी याची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
जिल्हााधिकारी बुवनशेवरीजिल्ह्यात अॅग्रीस्टेक योजना राबविण्यात येत असून, आजपर्यंत १६ हजारापेक्षा जास्त शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. शेतकर्यांनी तलाठी, कृषी सहायक, विकास अधिकारी यांच्यामार्फत अथवा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी करावी किंवा शेतकरी स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा नोंदणी करु शकतात. तेव्हा जिल्ह्यातील शेतकर्यांनी डिजीटल क्रांती आणणार्या अॅग्रीस्टेक योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले.