कारंजा लाड,
Bike accident : दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ जानेवारीला रात्री ९ वाजता च्या दरम्यान कारंजा नेर मार्गावर घडली. नितीन गजानन ढगे (वय २५) व अभिषेक नामदेव पांडे (वय २५) अशी जखमींची नावे असून ते दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुयातील अजनी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ते कारंजाहून नेर कडे जात असताना मार्गातील अपघातस्थळी त्यांच्या भरधाव दुचाकीच्या अचानकपणे नीलगाय आडवी आली. त्यामुळे ते खाली पडून गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना काही जणांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. Bike accident परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे.