मराठी साहित्यासाठी फडणवीस देताहेत् कृत्रिम बुद्धीमत्तेवर भर

31 Jan 2025 20:29:33
पुणे, 
CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात तिसर्‍या जागतिक मराठी संमेलनात, मराठी साहित्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्याची गरज व्यक्त केली. सोबतच भावी पिढ्यांना मराठी लेखकांच्या कलाकृतींचा लाभ घेता यावा, याबाबत÷भाष्य केले.
 
 
CM Devendra Fadnavis
 
या परिषदेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्याच्या मराठी भाषा विभागाला मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून लघु भाषा मॉडेल विकसित करण्याचा निर्देश दिला. चर्चा आणि मतभेदांशिवाय असे कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाहीत. वादविवाद निर्माण करणे हा आपल्या मूळ भाग आहे. खरे तर, आपण भावनिक आणि संवेदनशील लोक आहोत. वाद-विवाद व्हायलाच हवेत. मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल फडणवीस म्हणाले, आपली भाषा नेहमीच शास्त्रीय राहिली आहे, परंतु अधिकृत मान्यता महत्त्वाची आहे. मुघलांनी जेव्हा फारसीला या देशाची राजभाषा बनवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनीच मराठीला स्वराज्याची राजभाषा केली. त्यांनीच मराठीला राजेशाही दिली.
 
 
CM Devendra Fadnavis : मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल फडणवीस म्हणाले, आपली भाषा नेहमीच शास्त्रीय राहिली आहे; परंतु अधिकृत मान्यता महत्त्वाची आहे. मुघलांनी जेव्हा फारसीला या देशाची राजभाषा बनवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनीच मराठीला स्वराज्याची राजभाषा केली. त्यांनीच मराठीला राजेशाही मान्यता दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साहित्यिक कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी संकेतस्थळे तयार करण्याचे आता गेले. आता ते नाविन्यपूर्ण पद्धतीने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0