व्यापारातून अमेरिकन डॉलर वगळल्यास १०० टक्के कर

    दिनांक :31-Jan-2025
Total Views |
- ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा
 
वॉशिंग्टन, 
ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातून अमेरिकन डॉलर काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के कर लावणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. गुरुवारी समाज माध्यमवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी लिहिले, ब्रिक्स देश डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील आणि आपण फक्त बघत ही कल्पना आता संपली आहे. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ब्रिक्स देशांकडून नवीन चलन तयार न करण्याची आणि डॉलरशिवाय इतर कोणत्याही चलनाला पर्याय न देण्याची हमी मागितली आहे. ब्रिक्स देशांनी असे केले नाही, तर अमेरिकेत या देशांतील वस्तूंवर १०० टक्के कर आकारला जाईल. याशिवाय अमेरिकेसोबत या देशांचे व्यापारी संबंध येऊ शकते.
 
 
Donald Trump rty
 
चलन निर्मितीबाबत ब्रिक्समध्ये समाविष्ट सदस्य देशांमध्ये एकमत झाले नाही. याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियात झालेल्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेपूर्वी तेथील चलनाबाबत जोरदार चर्चा झाली होती. मात्र, शिखर परिषदेपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लालिमिर पुतिन यांनी ब्रिक्स संघटना स्वत:चे चलन तयार करण्याचा विचार करीत नसल्याचे केले होते. शिखर परिषदेत ब्रिक्स देशांच्या स्वत:च्या पेमेंट सिस्टमबाबत चर्चा झाली. गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि चीन अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून ब्रिक्स चलन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यावर एकमत झालेले नाही. ब्रिक्सच्या आगामी बैठकीत यावर चर्चा होण्याती शक्यता असताना Donald Trump ट्रम्प यांनी सदस्य देशांना इशारा दिला आहे.
जयशंकर स्पष्ट केली भारताची भूमिका
चलन निर्मितीबाबत ब्रिक्स सदस्य देशांमध्ये एकमत झालेले नाही तसेच यासंदर्भात अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत स्विफ्ट पेमेंट प्रणालीच्या धर्तीवर प्रणाली तयार करण्याबाबत चर्चा झाली. भारताने ब्रिक्स देशांना पेमेंट सिस्टमसाठी यूपीआय ऑफर केले होते. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर एका निवेदनात म्हटले होते की, भारत व्यापारात अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या बाजूने नाही तसेच ब्रिक्स चलनाचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.