नागपूर,
Dr. S. Venkat Mohan वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यातीरितील राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्थेचे (नीरी) नवनियुक्तसंचालक डॉ. एस. व्यंकट मोहन यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी, ते आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यातीरितील हैद्राबादच्या भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक होते. या संस्थेशी ते १९९८ पासून जुळले असून, पर्यावरण अभियांत्रिकी व शाश्वतता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्थापत्य अभियांत्रिकीत बी.टेक. व पर्यावरण अभियांत्रिकीत एम.टेक. पी.एचडी. पर्यंत त्यांचे शिक्षण आहे.
जपानच्या Dr. S. Venkat Mohan क्योटो विद्यापीठात अतिथी व्याख्याते तसेच जर्मनीच्या म्युनिच विद्यापीठात फेलो होते. जैवऊर्जा, डिकार्बोनायजेशन, मायक्रोबियल इलेक्ट्रोकेमिकल सिस्टम, बायो रिफायनरिज व वेस्ट वेलोरायजेशनमध्ये त्यांचे संशोधन आहे. याबरोबरच, शाश्वतता व सर्क्युलर बायो इकॉनॉमीवर केंद्रित आहे. त्यास अनेक पथदर्शी योजनांमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे.
डॉ. मोहन यांनी ४५० हून अधिक शोध पत्र, ६४ अध्याय व पाच पुस्तके लिहिली आहेत. १६ पेटंट ३६ हजारहून अधिक सायटेशन त्यांना मिळाले आहे.