- भाषणात भारतीय संस्कृती, परंपरांचे केले कौतुक
वॉशिंग्टन,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ डिसेंबर रोजी Kash Patel काश पटेल या भारतीय वंशाच्या अधिकार्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी अमेरिकेच्या सीनेटमध्ये काश पटेल यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी त्यांनी जय श्री कृष्ण म्हणत भाषणाची सुरुवात केली.
Kash Patel : अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत असलो तरी, भारतीय संस्कृती आणि परंपरा अभिमान आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी भाषणात म्हटले आहे. काश पटेल यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला, त्यात सीनेटच्या बैठकीआधी त्यांनी आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यांनी लिहिले की, माझे वडील प्रमोद व आई अंजना या दोघांमुळेच मी इथवर पोहोचलो आहे. मी त्यांचे या स्वागत करू इच्छितो. ते हा क्षण पाहण्यासाठी भारतातून येथे आले. त्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पटेल अमेरिकेत स्थायिक असले तरी भारतीय संस्कार व परंपरांपासून दूर गेलेले नाहीत, अशा शब्दांत त्यांचे कौतुक होत आहे.
ट्रम्प यांचे विश्वासू
डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व विश्वासू असलेले Kash Patel काश पटेल यापूर्वी अमेरिकेच्या विभागाचे चीफ ऑफ स्टाफ होते. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर पटेल हे ट्रम्प यांच्या नव्या प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले. पटेल हे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील सीनेटने गुरुवारी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला.