झुकेरबर्ग देणार ट्रम्प यांना २१७ कोटी रुपयांची भरपाई

    दिनांक :31-Jan-2025
Total Views |
- खटला न्यायालयाबाहेर निकाली
 
वॉशिंग्टन, 
Zuckerberg - Trump मार्क झुकेरबर्ग यांची कंपनी मेटा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २५ मिलियन डॉलर्स (सुमारे २१७ कोटी रुपये) नुकसान भरपाई देणार आहे. ट्रम्प यांनी याप्रकरणी कायदेशीर तोडगा काढला आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदेच्या हिलमध्ये झालेल्या दंगलीनंतर मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून ट्रम्प यांचे खाते हटवले होते. त्यावेळी ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर होते. मेटाच्या या निर्णयाबाबत ट्रम्प यांनी खटला दाखल केला होता. खटला न्यायालयाबाहेर निकाली काढण्यासाठी झुकेरबर्ग आणि ट्रम्प यांनी सहमती दर्शवली आहे.
 
 
Zuckerberg - Trump
 
Zuckerberg - Trump यासाठी झुकेरबर्ग नुकसान भरपाईपैकी २२ दशलक्ष ( १९० कोटी रुपये) ट्रम्प यांच्या लायब्ररीसाठी आणि उर्वरित रक्कम कायदेशीर शुल्कासाठी देणार आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मेटाने ट्रम्प यांची फेसबुक आणि इंस्टाग्राम खाती पुन्हा सुरू केली होती. नोव्हेंबरच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर मेटाने संबंधित प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू केली होती. झुकेरबर्गने अमेरिकन टेक कंपन्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि अमेरिकन मूल्यांचे संरक्षण केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाचे कौतुक होते. विशेष म्हणजे ट्रम्प आणि झुकेरबर्ग अनेक वर्षांपासून एकमेकांचे विरोधक आहेत. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी फेसबुक प्लॅटफॉर्मला ’ट्रम्पविरोधी’ म्हटले होते.