कत्तलीसाठी नेत असलेले गोवंश पकडले

04 Jan 2025 21:02:24
रिसोड, 
Cattle smuggling Washim : कत्तलीसाठी नेत असलेले गोवंश वाहनासह पकडून रिसोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
 
HJKH
 
 
 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर दिनकर साखरे (वय ३९) रा. चिंचांबा भर ता. रिसोड जि. वाशीम यांनी रिसोड पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांचा घराच्या समोरुन एक चार चाकी पांढर्‍या रंगाची टाटा एस क्र. एमएच २८ एच ९९०२ घरासमोरुन जातांना दिसले. सदर वाहनाची बारकाईने पाहाणी केली असता वाहन बद्दल संशय आला. त्यामुळे अन्य मित्रांसह त्या वाहनाचा पाठलाग केला. सदर वाहन हे लोणी मार्गे लोणारकडे जात असल्याचे निदर्शनात आले. त्या वाहनास लोणी खु. व लोणी बु. च्या दरम्यान थांबवण्यात आले व त्याची झडती घेतली असता त्यामध्ये दोन गाई, दोन वासर तसेच एक म्हैस (वगार) असे दिसून आले.
 
 
याबाबत रिसोड पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी पोहोचून सदर गोवंश वाहनासह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. याप्रकरणी पोलिसांनी शेख जाफर शेख मुसा (वय ५८) रा. लोणार जि. बुलढाणा व चालक शेख मुद्दशीर शेख जाफर (वय २३) रा. लोणार जि. बुलढाणा यांचे विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0