तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha News : नझूल जमीन ग्रीन-होल्ड (भोगवटदार वर्ग 1) करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून विशेष अभय योजना सुरू केली आहे. या विशेष अभय योजनेमध्ये नझूल जमीन ग्रीन-होल्ड तसेच नूतनीकरण करण्याकरिता उपविभागीय अधिकारी तथा नझूल अधिकार्यांकडे अर्ज सादर करावा. उपविभागीय अधिकारी कार्यालयात दर मंगळवार व गुरुवारी विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
नागपूर व अमरावती विभागातील नझूल जमिनी ग्रीन-होल्ड करण्याकरिता वाणिज्य/औद्योगिक प्रयोजनाकरिता 10 टक्के व निवासी प्रयोजनाकरिता 5 टक्के रुपांतरीत अधिमूल्य आकारुन अशा नझूल जमिनी ग्रीन-होल्ड करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. महसूल व वन विभागाने 16 मार्च 2024 रोजी विशेष अभय योजना 2024-25 शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. अभय योजना सन 2024-25 मध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2025 पर्यंत या कालावधीसाठीच लागू राहणार आहे.
निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे अन्यथा भाडेपट्ट्याने दिलेल्या नझूल जमिनीचे वार्षिक भू-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. 31 जुलैपर्यंत प्रलंबित भू-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येणार आहे.
भाडेपट्टाधारकाने भाडेपट्टा संपुष्टात आलेला असल्यास प्रथम भाडेपट्ट्याचे नूतनीकरण व सर्व प्रकारच्या शर्तभंगाचे नियमितीकरण प्रचलित धोरणानुसार करुन घेतल्यानंतरच जिल्हाधिकार्याकडे अर्ज सादर केल्यावर नझूल जमीन ङ्ग्रि-होल्ड करण्याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करुन जिल्हाधिकार्यांनी निर्धारित करण्यात आलेल्या रुपांतरण अधिमूल्याचा भरणा करुन घेवून अशी नझूल जमीन ग्रीन-होल्ड करण्याबाबतचे आदेश पारित करण्यात येणार आहेत. विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार असून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.