- स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सर्वांगीण विकास महत्त्वाचा
-गजानन निमदेव यांचे प्रतिपादन
- सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी
नागपूर,
Sneha Sammelan : हनुमाननगरातील हिंदू विद्या भवन, शांतीनिकेतनमध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आ. प्रवीण दटके, दै. तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्वस्त माजी अध्यक्ष अरुण जोशी होते. सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आ. प्रवीण दटके म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारकिर्दीचा प्रचार व प्रसार अरुण जोशी अनेक वर्षांपासून करीत आहेत. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा, शाळांमध्ये अभ्यासपूरक कार्यक्रमाला महत्त्व देण्यात यावे, असेही ते म्हणाले.
तरुण भारतचे संपादक गजानन म्हणाले की, मागील ५१ वर्षांपासून विनाअनुदान तत्वावर शाळा चालविणे हे सोप काम नाही. परंतु आजही ही संस्था उत्तमरित्या कार्य करीत आहे. आजचे युग स्पर्धांत्मक आहे. त्यात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होणे गरजेचे आहे. त्याकरिता शाळांनी यथायोग्य अभ्यासक्रम राबवायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे मान्यवरांनी अवलोकन करून केले. अरुण जोशी यांनीही स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या. वंदे मातरमच्या जयघोषाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात झाली.
Sneha Sammelan : विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकृतींचे उत्तम सादरीकरण केले. संचालन भावना इंगळे, रितेश पंडेल व प्रांजुल गुप्ता, प्रास्ताविक प्राचार्या दीपिका वाठ, आभार प्रदर्शन राधा महतो यांनी केले. कार्यक्रमासाठी विश्वस्त अभिजित जोशी, महालक्ष्मी जोशी, शिक्षिका शैला कुकडे, झोंबाडे, सोनाली राऊत, श्रुतिका सारवे, तेजस्विनी पंचबुधे, कोमल फिस्के, उज्ज्वला राऊत, मनिषा मराठे, रूपाली ढोरे, मुस्कान सिंह, किरण तावडे, मोनाली मंदपती, संजु अतकरे, वृषभ जिल्हारे, पल्लवी डोकरीमारे, हिमानी दमहे, शैलेश आंभोलकर, पूर्विता रनधिवे, निलेश्ववरी मलघाटे, पपिता राऊत, डॉ. जयदीप घोष, डॉ. दत्तात्रेय करांगळे, संदीपा भड, प्रा. भावना इंगळे, प्रा. घोष यांनी परिश्रम घेतले.