नागपूर,
KGN Football Team-Nagpur : सहयोगनरातील डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर आज झालेल्या पहिल्या इलाईट डिव्हिजन सामन्यात केजीएन संघाने बीग बेन फुटबॉल संघाचा पराभव केला. नाहिद कुरेशी- १०, तुषार यादव - १५ आणि ४४, तुषार उरकुडे २८ व मोह. अजहर मिनिटात गोल केला. बीग बेनतर्फे खेळाडूंनी बरेच परिश्रम केले, पण त्यांना एकही गोल करण्यात यश मिळाले नाही. शेवटी केजीएनचा विजय झाला. रेफरीने केजीएनतर्फे नाहिद कुरेशी व बीग बेनचा खेळाडू महेन्द्र तायवाडे याला सावधान केले होते.
ओएनएफसीने राहुल अकादमीला हरविले :
सहयोगनरातील डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर आज झालेल्या दुसर्या सिनियर सामन्यात ओएनएफसी फुटबॉल संघाने १-० गोल फरकाने राहुल अकादमी संघाला पराभूत केले. KGN Football Team-Nagpur एका मात्र गोल मुजामिल शेख या ओएनएफसीच्या खेळाडूने २५व्या मिनिटात करत सामना जिंकण्यास मोलाची मदत केली. मात्र राहुल अकादमीतर्फे खेळाडूंना एकही गोल करण्यास यश मिळू शकले नाही.