नागपूर,
Anasuya Mata's death anniversary संत गजानन महाराज श्रद्धास्थान वऱ्हाडपांडे यांच्या मंदिरात रेशीमबागेत शुक्रवारी १० जानेवारीला पारडसिंगा निवासीनी अनसूया मातेचा २८वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सकाळी ८.३० वाजता माऊलीचा पालखी सोहळा होईल. त्यानंतर १० वाजता सर्व भाविकांतर्फे माऊलीला मंत्रोपचाराने अभिषेक, त्यानंतर १०.३० वाजता संतकवी कमलासूत रचित महाशक्ती अनसूया माता चरित्र ग्रंथाचे पारायण, माऊलीला शेज आणि मंगल आरती, दुपारी १ ते ६ महाप्रसाद वितरित करण्यात येईल.
संध्याकाळी Anasuya Mata's death anniversary ६.३० वाजता आपणा सर्वांना माऊलींचे दर्शन व्हावे. यासाठी, संतकवी कमलासूत उपाख्य चंद्रशेखर वराडपांडे रचित गीतं आणि माऊलीचा समाधी सोहळा व्हिडिओद्वारे दाखविण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी माऊलीच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्रद्धास्थानाचे आयोजक गिरीश वऱ्हाडपांडे यांनी केली आहे.