गुणात्मक वाढ म्हणजेच पंच परिवर्तन!

Centenary year of RSS सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था

    दिनांक :09-Jan-2025
Total Views |
इतस्तत: 
 
 
- विवेक राजे
Centenary year of RSS जगातील सगळ्यात माेठी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येणाऱ्या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण करणार आहे. काही अपवादात्मक व्यावसायिक संघटना साेडल्यास 100 वर्षे एका ध्येयाने प्रेरित हाेऊन सातत्याने कार्यरत असणारी सामाजिक सांस्कृतिक संस्था आज तरी जगात दुसरी नाही. 1925 मध्ये विजयादशमीला पहिले पाच स्वयंसेवक बराेबर घेऊन डाॅ. हेडगेवारांनी रुजवलेल्या या संघटनेचे आता एका प्रचंड माेठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेले दिसते आहे. या 100 वर्षांच्या काळात संघावर अनेक आघात झाले. Centenary year of RSS ते सगळे आघात-आराेप झेलत संघ आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत राहिला. हिंदू समाजाचे संघटन करताना संघाने काळानुरूप बदल स्वीकारले. 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या या हिंदूंच्या संघटनेने शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तनाची हाक दिलेली आहे.
 
 
 
 
Centenary year of RSS
 
 
 
Centenary year of RSS समाजात कार्य करताना काेणतीही संघटना वा व्यक्ती त्याच समाजाच्या संपर्कातून प्रभावित हाेत असते. त्याच वेळी ते संघटन वा व्यक्ती समाजाला प्रभावित करीतच असते. सद्य:काळात हिंदू समाजाला जर काेणत्या एका विचाराने सर्वाधिक प्रभावित केले असेल तर ताे निःसंशयपणे संघ विचार हाेय. तसेच आज हिंदू समाजाला सर्वाधिक प्रभावित करणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हाेय, हे संघाचे टीकाकारही मान्य करतील. Centenary year of RSS समाज संघटनाचे कार्य हे निरंतर चालणारे कार्य आहे, याची संघाला प्रथमपासूनच चांगली जाणीव आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सामाजिक विघटनाला कारणीभूत ठरणारे विविध आयाम लक्षात घेत संघाने पंच परिवर्तनाची हाक दिलेली आहे. स्वदेशी, कुटुंब प्रबाेधन, नागरी कर्तव्यांचे पालन, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण हे ते पाच आयाम आहेत.
 
 
 
Centenary year of RSS जगात विविध प्रदेशांत तेथील हवामान, वातावरण, वैचारिक स्वातंत्र्य आणि प्रगल्भता, जीवनाप्रति सर्वसामान्य लाेकांना असणारी आस्था आणि स्थापित व्यवस्थेनुसार विविध संस्कृती आकाराला आल्या. या देशात एक सर्वसमावेशक, उदार, सहिष्णू आणि निसर्गाभिमुख जीवनदायी अशी संस्कृती अस्तित्वात आली. काळानुसार त्यात काही बदल झाले; मूळ तत्त्व मात्र कायम राहिले. त्यातच युराेप आणि मध्यपूर्वेतून झालेले आक्रमण हे धार्मिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक आक्रमणदेखील हाेते. Centenary year of RSS त्याचा परिणाम म्हणजे येथील लाेकांच्या जीवनविषयक श्रद्धांची प्रचंड माेठ्या प्रमाणावर माेडताेड हाेण्यात झाली. येथील संस्कृतीने निर्माण केलेली निसर्गाभिमुख, उदार जीवनदृष्टी उद्ध्वस्त हाेण्याचा धाेका निर्माण झाला. आज जेव्हा विविध कारणांनी जग अधिकाधिक जवळ येते आहे तेव्हा हा धाेका सर्वाेच्च पातळीवर पाेहाेचलेला दिसताे.
 
 
 
Centenary year of RSS त्यामुळे आज समाजातील प्रत्येक व्यक्तीला ‘स्व’चे भान असणे आवश्यक झाले आहे. ‘स्व’चे भान याचा अर्थ या मातीत तयार झालेले विचार, जीवनदृष्टी, संसाधनांचा सदुपयाेग, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, विचारशीलता, माणूस म्हणून व्यवहार समजणे आणि व्यक्ती तथा समाजाने तसे जीवन अंगीकारणे हाेय. पंच परिवर्तनातील दुसरा मुद्दा हा कुटुंब प्रबाेधनाचा हाेय. व्यक्ती-व्यक्ती मिळून समाज तयार हाेताे. समाज एकसंध राहण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था हाेय. Centenary year of RSS काेणत्याही समाजाला एकत्र ठेवण्यात कुटुंब व्यवस्था माेठे याेगदान देते. पण आज या कुटुंब व्यवस्थेलाच सुरुंग लागलेला दिसताे आहे. तीन पिढ्यांनी एकत्र राहणे एवढा मर्यादित विचार कुटुंब व्यवस्थेत असत नाही तर संस्कार संक्रमित करणारी किंवा संस्कारांची सुदृढ जाेपासना करणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब हाेय. सदस्यामध्ये संवाद हे कुटुंबात अभिप्रेत असलेले वैशिष्ट्य हाेय.
 
 
 
Centenary year of RSS दुर्दैवाने आज एकमेकांबराेबर वेळ घालवणे, संवाद साधणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सदस्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढे स्वातंत्र्य देणे, परस्परांविषयी आदर, हे कुटुंबातून घडताना दिसत नाही. स्वकेंद्रित विचार आणि कृती घडताना दिसत आहेत. कुटुंब व्यवस्थेचे अधःपतन हाेताना दिसत आहे. सुदृढ समाज सुदृढ कुटुंबातूनच आकाराला येत असताे. सशक्त जीवनविषयक दृष्टिकाेन आणि जीवनशैली सशक्त व सुदृढ कुटुंब व्यवस्थेतूनच आकाराला येऊ शकते. Centenary year of RSS म्हणून कुटुंब प्रबाेधन आजच्या काळात अत्यावश्यक आहे. पंच परिवर्तनातील तिसरा मुद्दा नागरी कर्तव्यांचे पालन हे आहे. नागरी कर्तव्यांचे पालन म्हणजे, राष्ट्र म्हणून जे काही नियम असतील त्या नियमांचे पालन करणे हाेय. आम्हाला नागरिक म्हणून काही निहित कर्तव्य आहेत.
 
 
 
Centenary year of RSS जसे रहदारीचे सर्वसामान्य नियम आहेत. ज्यामध्ये मार्गाच्या डाव्या बाजूचा वापर किंवा चाैकावरील सिग्नल पाळणे, महामार्गांवर दिलेले गतिनिर्बंध यासारख्या नियमांचा समावेश हाेताे. या सगळ्या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हाेय. लाेकशाहीमध्ये मतदान करणे हे सर्व नागरिकांचे निहित कर्तव्य आहे. आज या देशात लाेकशाही आहे हे अभिमानाने सांगणारे अनेक लाेक मतदान करण्याचे कर्तव्य टाळताना दिसतात. Centenary year of RSS ही नागरी कर्तव्याची पायमल्लीच ठरते. आपले विहित कर न भरता उत्पन्नाचे स्राेत लपवणे हेदेखील नागरिक कर्तव्याला चुकतात हेच दाखविते. कर्तव्यपालनामुळे दाेन नागरिकांमध्ये किमान सामंजस्य निर्माण हाेते. राष्ट्राला काेणत्याही प्रकारे हानी पाेहाेचेल अशी काेणतीही कृती न करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच हाेय.
 
 
 
Centenary year of RSS आज अधिकारांबाबत जागृत असलेला आमचा समाज कर्तव्यांकडे दुर्लक्ष करताना दिसताे. पंच परिवर्तनातील चाैथा स्तंभ म्हणजे सामाजिक समरसता. सामाजिक समरसतेचा संघाला अभिप्रेत असलेला अर्थ हा की, काेणत्याही व्यक्तीने आपल्या वर्गाबाहेरील किंवा समूहाबाहेरील व्यक्तींप्रति आत्मीयतेने व प्रेमाने व्यवहार करणे हाेय. प्रदेश, भाषा, रंग, खानपान, पाेशाख तसेच जाती, उपासना पद्धती यामध्ये विविधता असणे हे नैसर्गिक आहे. हे मान्य करून त्या पलीकडे जात या वेगळेपणाचा सन्मान करीत साैहार्दपूर्ण व्यवहार म्हणजे सामाजिक समरसता. Centenary year of RSS सर्व समाजघटकांच्या मनात एकमेकांबद्दल एक विश्वास, आदर आणि प्रेम निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत या विविधतेचा वापर करून या देशाला, विखंडित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. समरसता साधण्यात समाज अपयशी ठरला तर भविष्यातही हा धाेका निर्माण हाेणार हे नक्की!
 
 
 
 
Centenary year of RSS त्यामुळेच या देशाला व हिंदू समाजाला सशक्त करण्यासाठी सामाजिक समरसतेच्या भावनेला दृढमूल केले पाहिजे. पंच परिवर्तनाची पाचवी पायरी म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे. या पृथ्वीवर मानवी अस्तित्व हे निसर्गाचाच घटक आहे. मानवी जीवन या संपूर्ण चराचर सृष्टीचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. परंतु अनियंत्रित भाेगवादामुळे आम्ही निसर्गाचे आणि पर्यायाने मानवजातीचे अपरिमित नुकसान करीत आहाेत. निसर्गाचे संवर्धन करण्याऐवजी आम्ही त्याची भरून न येऊ शकणारी हानी करीत आहाेत. जागृत विचार आणि आचार समाजात निर्माण करून देण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
 
 
 
Centenary year of RSS रासायनिक खते, जंतुनाशके आणि प्लॅस्टिकच्या वापराला निक्षून नकार देणे गरजेचे आहे. पण यासाठी निश्चय आणि धारिष्ट्य समाजात निर्माण हाेणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण हे भारतीय जीवन पद्धतीचा महत्त्वपूर्ण घटक हाेता. ताे विचार आणि कृती याला समाजात पुन्हा महत्त्वपूर्ण स्थान मिळण्यासाठी या दिशेने समाजात कृतिशीलता बाणवणे हेच या पाचव्या स्तंभाचे उद्दिष्ट आहे. Centenary year of RSS समाज संघटन करीत असतानाच समाजात गुणात्मक वाढही व्हायला हवी. आज संघ विचारांना जागतिक पातळीवर सर्व समाज घटकांमध्ये मान्यता मिळालेली दिसते आहे. संस्कृती संवर्धन आणि हिंदू समाज संघटन करतानाच समाजात गुणात्मक वाढ हाेण्यासाठी प्रयत्न म्हणजेच पंच परिवर्तन हाेय.
 
 
9881242224