एचएसआरपी नंबर प्लेट्स वाहनांना अनिवार्य

09 Jan 2025 14:15:59
-२०१९ नंतरच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक नंबर प्लेट्स
नागपूर,
HSRP number plates : वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक स्वरूपात तयार करण्यात आलेली हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) वाहनांना अनिवार्य करण्यात आली आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांवरील प्लेट बदलून त्याऐवजी अत्याधुनिक प्लेट लावायची आहे. ही जबाबदारी स्थानिक डीलर्सवर साेपविण्यात आली आहे. सर्व वाहनचालकांनी ३१ मार्चपूर्वी प्लेट बदलून घेण्याचे निर्देश आहेत. सुरक्षा प्लेटमधील नाेंदणी क्रमांक आणि अक्षरांवर हाॅट स्टॅम्प फिल्म लावली जाते.

adhikari 
 
यासाेबतच निळ्या रंगात आयएनडी लिहिलेले राहील. ही प्लेट वाहनाच्या डिजिटल नाेंदणीनंतरच जारी केली जाते. नंबर प्लेट वाहनावर लावल्यानंतर पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नंबर प्लेट बनविलेली असल्याने क्रमांकात छेडछाड करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास ती तुटते. HSRP number plates याशिवाय नंबर प्लेट आणि वाहनांचा गैरवापर हाेऊ नये, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. प्लेटच्या काेपèयात हाेलाेग्राम आहे तसेच एक लेसर ब्रँडेड १० अंकी स्थानिक ओळख दिली गेली आहे. त्यामुळे चाेरीचे वाहन शाेधण्यास मदत हाेईल. वाहतुकीचे नियम पाळले जातील. विशेष म्हणजे नंबर प्लेट बाहेर कुठेच तयार हाेत नाही.
 
नागपूर शहरात वाहनांची संख्या जवळपास २१ लाख आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक म्हणजे १६ लाखांच्या आसपास आहे. राज्य परिवहन विभाग आयुक्त कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार एक एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व वाहनांवर हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आहेत. वाहन खरेदी करणाèयांना डीलरकडूनच नंबर प्लेट्स लावून मिळतात. आता २०१९ पूर्वीच्या वाहनांनासुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. HSRP number plates २१ लाख वाहनांपैकी जवळपास ५० टक्के वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी सर्व वाहनांवर नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असल्याने वाहनचालकांची धावपळ हाेत आहे. सर्व डीलर्सला याबाबत निर्देश आहेत. ऑनलाईन बुकिंग करून ऑनलाईन रक्कम जमा केल्यास दिलेल्या तारखेवर नंबर प्लेट लावून मिळेल. आवश्यकता भासल्यास केंद्रे सुरू करता येतील. वाहनचालकांची संख्या अधिक असल्याने कदाचित मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
नवीन केंद्रे सुरू करणार
एक एप्रिल २०१९ पासून आलेल्या वाहनांवर हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असतेच. आता केवळ जुन्या वाहनांवर एचएसआरपी लावायच्या आहेत. ही जबाबदारी स्थानिक डीलर्सवर साेपविण्यात आली आहे. वाहनांची संख्या अधिक आणि वेळेचे बंधन असल्याने नवीन केंद्रे सुरू करण्यात येतील. HSRP number plates अधिक माहिती परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून घेता येईल. किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी
Powered By Sangraha 9.0