कामगारांच्या सवारगीण विकासासाठी कटिबद्ध

09 Jan 2025 15:28:21
-भामसं शिष्टमंडळासाेबत बैठक
नागपूर,
Labor Minister Akash Fundkar : प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक व शारीरिक पातळीवरही हाेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी दिली. मुंबई मंत्रालयात त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. भामसंचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही.राजेश, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र गणेशे, महामंत्री कामगार नेते गजानन गटलेवार, जिल्हा प्रमुख हर्षल ठाेंबरे, प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर प्रामुख्याने उपस्थित हाेते.
 
Akash Fundkar
 
आकाश फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे कामगार धाेरण तयार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियाेजन असून या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य याेजना विचाराधीन आहे. निवेदन सादर करून कामगारांच्या समस्या, अडचणी, मागण्या, अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. Labor Minister Akash Fundkar भामसंघ प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, सचिव विशाल माेहिते, अ.भा. ठेका मजदुर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, जिल्हा सचिव सागर पवार, असंघटित क्षेत्र सह प्रभारी श्रीपाद कुटासकर, बाळकृष्ण कांबळे, घरेलु कामगार संघ प्रदेश अध्यक्ष शर्मिला पाटील, सरचिटणीस संजना वाडकर, हरी चव्हाण उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0