पकड वारंट टाळणारे आणखी ३ आरोपी अटकेत

01 Oct 2025 19:31:21
मंगरूळनाथ,
Mangrulnath police, वाशीम पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार मंगरूळनाथ तालुक्यात पकडवारंट टाळणार्‍या २१ आरोपींची धरपकड केल्यानंतर पुन्हा ३० सप्टेंबर रोजी आणखी ३ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

Mangrulnath police
विविध गुन्ह्यातील आरोपीं हे पकड वॉरंट बजावल्यानंतरही न्यायालयात हजर राहत नव्हते. यामध्ये आरोपी काशीराम विश्वनाथ गोरे,प्रभू तानाजी गोरे रा. सोनखास ता. जि. वाशीम रामचंद्र लक्ष्मण वाणी, रा.माळेगाव जिल्हा वाशीम याचा समावेश आहे. सदर आरोपी अनेक वर्षांपासून न्यायालयात तारखेवर हजर राहत नव्हते. तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामविलास गुप्ता, पोकॉ राजा सावके, नदीम हिरेवाले,शबनम नंदावाले यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0