'बालिका वधूचे धुमधडाक्यात लग्न

01 Oct 2025 13:30:02
मुंबई
Avika Gor Milind Chandwani लोकप्रिय दूरदर्शन अभिनेत्री अविका गौर आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चंदवानी यांनी अखेर विवाहबंधनात अडकत आपल्या सहजीवनाची नवी सुरुवात केली आहे. सोमवार, ३० सप्टेंबर रोजी दोघांनी कलर्स टीव्हीवरील 'पति पत्नी और पंगा' या कार्यक्रमाच्या सेटवर लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, अविका गौर ही ज्या चॅनलवरून 'बालिका वधू' मालिकेमुळे घराघरात पोहोचली, त्याच चॅनलवर तिचा विवाह सोहळा पार पडला.
 
 

Avika Gor Milind Chandwani  
लग्नाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हल्दी आणि मेहंदीच्या समारंभानंतर अविका आणि मिलिंद यांनी कुटुंबीय तसेच कार्यक्रमातील स्पर्धकांच्या साक्षीने सात फेरे घेतले. या उत्सवमय वातावरणातील त्यांच्या बारातचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता या जोडप्याच्या नवविवाहित अवस्थेतील अधिकृत फोटोंनाही रसिकांची पसंती मिळत आहे.लग्नाच्या दिवशी अविका गौरने परंपरागत लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता, ज्यासोबत तिने हिरव्या रंगाची ज्वेलरी घातली होती. मिलिंद चंदवानीने मात्र साधेपणातही उठावदार दिसणारा बेज रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. दोघेही 'पति पत्नी और पंगा'च्या सेटवर विवाह सोहळ्यात अत्यंत आनंदित आणि उत्साही मूडमध्ये दिसले.
 
 
 
या खास प्रसंगी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या. शोच्या सूत्रसंचालिका सोनाली बेंद्रे, अभिनेत्री हिना खान, रॉकी जायसवाल, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी, रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, स्वरा भास्कर, फहाद अहमद, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, तसेच राखी सावंत, फराह खान, कृष्णा अभिषेक आणि 'बिग बॉस १७' फेम समर्थ जुरेल यांची विशेष उपस्थिती लाभली.
 
 
 
माध्यमांशी संवाद Avika Gor Milind Chandwani  साधताना अविका गौरने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ती म्हणाली, "अशा काही सकाळी असतात, जेव्हा मी उठून स्वतःलाच आठवण करून देते की हे खरंच घडतंय. मला एक असा जोडीदार मिळाला आहे जो मला समजतो, आधार देतो आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरणा देतो, हे मी स्वतःला भाग्यवान समजते."तिने पुढे सांगितले की, "मी नेहमी आई-वडिलांना म्हणायचे की, मी लग्न कोर्टात करीन किंवा मग एकदम भव्य समारंभात. आज माझं बालपणीचं स्वप्न खरं झाल्यासारखं वाटतंय."अविका आणि मिलिंदची पहिली भेट २०१९ साली झाली होती आणि २०२० पासून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. पाच वर्षांच्या सहजीवनानंतर मिलिंदने अविकाला विवाहासाठी प्रपोज केलं आणि त्यांनी ११ जून रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती.सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड गाजत असून, या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0