केळझर,
constitution-satyagraha-yatra : काँग्रेसच्या वतीने दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह पदयात्रा काढण्यात आली. २ ऑटोबर रोजी सेवाग्राम येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या दुसर्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी या यात्रेचा वर्धा जिल्ह्यात प्रवेश झाला. रात्री ८ वाजता स्थानिक बाजार चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वत्यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केले. संचलन विशाल चौधरी यांनी केले.
आज १ रोजी सायंकाळी या यात्रेचा वर्धा शहरात प्रवेश झाला. वर्धा शहराच्या सीमेवर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. उद्या गांधी जयंती २ ऑटोबर रोजी या पदयात्रेचा समारोप होणार आहे.