लग्नाचा पहिल्या रात्री नवरींन म्हणाली ''आज मत छूना'... खरे कारण आले समोर

01 Oct 2025 15:41:09
राजस्थान
fake bride scam Rajasthan राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणाच्या आयुष्याला धक्का बसवणारी घटना उघडकीस आली आहे. एका लुटेरी नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील दागिने घेऊन पसार होत सर्वांच्या डोळ्यांत धूळ फेकली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात एका दलालाचा हात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

fake bride scam Rajasthan  
ही घटना किशनगड येथील असून जितेंद्र नावाच्या तरुणाने जयपूरमध्ये धूमधडाक्यात विवाह केला होता. आग्रा येथील वधूशी त्याचे लग्न एका दलालाच्या माध्यमातून ठरले. दलालाने या विवाहासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली होती, जी जितेंद्रच्या कुटुंबाने पूर्ण केली होती. त्यानंतर जयपूरमध्ये मोठ्या थाटात विवाह पार पडला आणि जितेंद्र आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन घरी आला.
 
 
 
नववधूचे घरात fake bride scam Rajasthan  मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. मात्र, विवाहानंतरच्या पहिल्या रात्री म्हणजेच सुहागरात नववधूने जितेंद्रसमोर एक विचित्र मागणी ठेवली. तिने सांगितले की, त्यांच्या घरातील परंपरेनुसार, नवविवाहित जोडपं पहिल्या रात्री एकत्र राहत नाही. त्यामुळे ती त्याच्यासोबत झोपू शकणार नाही. यावर सरळसोट जितेंद्रने तिची ही मागणी मान्य केली. इतकंच नाही तर, नववधूने सासूच्या दागिन्यांचीही मागणी केली, असं सांगत की ती रात्रीसाठी सासूचे दागिने परंपरेनुसार घालते. विश्वासू सासूनेही तिला सहजपणे दागिने देऊन टाकले.मात्र, रात्रीचा खेळ पहाटे उघड झाला. रात्री जितेंद्र झोपेतून उठून पाणी पिण्यास गेला असता, त्याच्या लक्षात आलं की पत्नीच्या खोलीचा दरवाजा उघडा आहे. आत पाहिलं असता ती गायब होती. अलमारीही उघडी होती आणि त्यातील सर्व दागिने नाहीसे झाले होते. घाबरलेल्या जितेंद्रने कुटुंबाला उठवले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, पण ती कुठेच सापडली नाही.
 
 
 
या प्रकारानंतर fake bride scam Rajasthan  जितेंद्रने थेट पोलिस ठाणे गाठले आणि पत्नी व दलालाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. किशनगड येथील मदनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या नववधू आणि दलाल दोघेही फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी धाड टाकत आहेत.अनेकदा सोशल मीडियावर अशा लुटेरी नववधूच्या घटना समोर येत असतात, पण प्रत्यक्षात ही घटना जितेंद्रच्या आयुष्याला हादरा देणारी ठरली आहे. अशा विवाह दलालांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
Powered By Sangraha 9.0