धान्याचा चुकारा न देता, शेतकर्‍यालाच खंडणीची मागणी

01 Oct 2025 21:44:44
वर्धा, 
farmer-news-wardha : शेतकर्‍याला तूर आणि चणा विक्रीची रकम न देता त्याची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना यशवंत कॉलनी, धुनिवाले मठ येथे उघडकीस आली.
 
 
k
 
रवींद्र डायगव्हाने (५८) रा. वाहितपूर याने कैलास काकडे रा. वर्धा याला तूर आणि चणा विक्री केली होती. त्याच्याच मालवाहू वाहनात धान्य भरून वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला नेले. दोन्ही मालाची रकम ३ लाख ६६ हजार १८४ रुपये झाली. काकडे याने चुकारा नगदी देतो, असे सांगितले होते. परंतु, तीन महिने लोटूनही पैसे न दिल्याने त्याला पैशाची मागणी केली. यामुळे त्याने मुलाच्या व त्यांच्या नावे दोन धनादेश दिले. परंतु, हे दोन्ही धनादेश वठले नाही. यानंतर त्याने दोनदा पुन्हा धनादेश दिले. तेसुद्धा वठले नाही. डायगव्हाणे हे त्यांच्या घरी पैसे मागण्याकरिता सतत जात होते. परंतु, त्याने माझ्यावर पोलिस केस सुरू आहे. माझे लायसन्स रद्द झाले आहे.
 
 
आता माझा मुलगा अनिरुद्ध काकडे याचे नावाने लायसन्स आहे. तुम्ही यापुढे माझ्या मुलाला धान्य विकल्यास मी तुमचे पैसे परत करील, नाही तर मी तुमचे धान्यही कुणाला विकू देणार नाही. तसेच आपल्याला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली व न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. काकडे याच्या घरीच राजू मदनकर रा. सोनापूर, जि. चंद्रपूर याची भेट झाली होती. त्याने कैलास काकडे याला तांदळाचे धान दिले होते. त्यांचे २० लाख रुपये न देता त्यांची सुद्धा फसवणूक केल्याचे उघडकीस आले. आपलीसुद्धा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वर्धा शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0