मरसूळ-बेलखेड बसथांब्यावर अवैध दारूविक्री

01 Oct 2025 19:12:47
तभा वृत्तसेवा उमरखेड,
illegal liquor sale Marsul Belkhed मरसूळ बेलखेड श्रीदत्तनगर या गावांच्या बस थांब्यांवर अवैधपणे गावठी देशी दारूची खुलेआम विक्री होते. या प्रकारामुळे मरसुळच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणची दारूविक्री कायम बंद व्हावी, याबाबत निवेदन बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांना भेटून त्रासलेल्या नागरिकांनी दिले.
 

illegal liquor sale Marsul Belkhed 
मरसूळ श्रीदत्तनगर येथील शाळकरी मुली व महिला रोज शहरी ये-जा करीत असतात. बसची वाट पहात थांबलेल्या महिला व सभ्य नागरिकांना मद्यप्राशन केलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात होणारा त्रास सहन करावा लागतो, अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत.
बिट जमादार व सहायक पोलिस निरीक्षक तसेच ठाणेदारांनी या प्रकाराविरोधात गंभीर पाऊले उचलून व्यसनाधीन होत चाललेल्या युवा पिढीला दिलासा मिळेल आणि दारू पिऊन होणाèया त्यांच्या संसारातील भानगडींनाही विराम मिळेल, असे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या भेटीप्रसंगी शेकडोवर स्वाक्षèया केलेल्या नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0