‘कांतारा चैप्टर 1’ला प्रीमियरपूर्वी मोठा झटका

01 Oct 2025 12:27:38
मुंबई,
kantara chapter 1 ‘कांतारा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर जे झंझावात निर्माण केला होता, त्यामुळे प्रेक्षक आणि निर्माते दोघंही ‘कांतारा चैप्टर 1’कडून प्रचंड अपेक्षा बाळगून होते. ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून परतत आहेत. परंतु प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
 

kantara chapter 1 
मूळतः २ kantara chapter 1  ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे प्रीमियर शोज १ ऑक्टोबरच्या रात्री आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, एकाएकी हे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या शोसाठी प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही, त्यामुळे निर्मात्यांनी अंतिम क्षणी ही योजना मागे घेतली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे सर्व शोज २ ऑक्टोबरपासून नियमितपणे सुरू होतील.यासोबतच, ऋषभ शेट्टीचा हा बहुचर्चित चित्रपट वरुण धवनच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’सोबत थेट टक्कर देणार आहे. हिंदी पट्ट्यात ही स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरणार आहे. सध्या दोन्ही चित्रपटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. मात्र, आकड्यांवर नजर टाकल्यास, कांतारा पुढे असल्याचे स्पष्ट होते. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे सुमारे १८.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे, तर हिंदी भाषेत ५७ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली असून, त्यातून १.८१ कोटी रुपयांचा व्यवसाय झालाय.
 
 
परंतु, ट्रेड विश्लेषकांच्या मते, हा आकडा अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, विशेषतः हिंदी मार्केटसाठी. कर्नाटक राज्यात चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असला, तरी इतर प्रादेशिक बाजारपेठांमध्ये — विशेषतः उत्तर भारतात — चित्रपटाची झळकती सुरू होण्यास अजून वेळ लागणार असल्याचे दिसत आहे.
कांताराच्या kantara chapter 1  लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्मात्यांनी तेलुगू बाजारात विशेष प्रयत्न केले होते. तेलुगू ट्रेलर प्रभासने लाँच केला होता, तर प्री-रिलीज इव्हेंटला ज्युनिअर एनटीआरसारखा स्टार हजर होता. आंध्र प्रदेशमध्ये तिकीटांचे दरही वाढवण्यात आले आहेत. तरीदेखील, कर्नाटकच्या बाहेरील राज्यांमध्ये ‘कांतारा चैप्टर 1’च्या वाटचालीबाबत साशंकता कायम आहे.दुसऱ्या बाजूला, वरुण धवनचा रोमान्टिक-कॉमेडी मसाला चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ देखील त्या दिवशीच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळेल. एकीकडे पौराणिकतेची पार्श्वभूमी असलेली गूढ कथा, तर दुसरीकडे हलकी-फुलकी प्रेमकहाणी — दोन्ही प्रकारचे प्रेक्षक कोणता सिनेमा निवडतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
सध्याच्या घडीला ‘कांतारा चैप्टर 1’ला जोरदार सुरुवात झाली आहे, मात्र ती केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हिंदी मार्केटमधील प्रतिसाद कसा असेल आणि चित्रपट राष्ट्रीय स्तरावर किती यश मिळवेल, हे येणारे काही दिवस ठरवतील.
Powered By Sangraha 9.0