कारंजा लाड,
Karanja Lad नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा मुगसाजी भवन, मानोरा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडल्या. १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगट व वजनगटात झालेल्या या स्पर्धेत कारंजा येथील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कराटे मास्टर सुधाकर दमगीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत २७ पदके पटकावली. जे. सी. हायस्कूलने सुवर्ण व रौप्य, जे. डी. चवरे हायस्कूलने ४ रौप्य व ४ कांस्य, गोविंद स्कूलने २ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य, एम. बी. आश्रम शाळेने १ सुवर्ण व १ रौप्य, पु.पु. नारायण महाराज विद्यालयाने रौप्य, कंकुबाई कन्या शाळेने १ सुवर्ण व २ कांस्य, पिंपरी फॉरेस्ट सायन्स कॉलेजने १ रौप्य, ब्ल्यूचिप शाळेने १ रजत आणि के. एन. कॉलेजने १ रौप्य अशा ५ सुवर्ण, ११ रौप्य आणि ११ कांस्य अशी लक्षणीय कमाई केली.
स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेभुर्णीकर यांनी अभिनंदन केले.
प्रशिक्षकाचा आमदारांकडून सत्कार
कारंजा येथील शेतकरी निवास येथे आ. सई डहाके यांच्या हस्ते कराटे खेळाडू मुला - मुलींसह कराटे मास्टर सुधाकर दमगीर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कारंजा च्या कराटेपटूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत केलेल्या या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण तालुका अभिमानाने उजळून निघाला आहे.
छायचित्र - जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले कराटेपटू