गोंदिया,
building collapses इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच भिंत अंगावर कोसळून भींतीच्या मलब्याखाली दबून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मजुर गंभीर जखमी झाला. ही घटना गोंदिया शहरातील मुख्य बाजार पेठ परिसरात बुधवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय पाचे असे मृत मजुराचे तर जितेंद्र बाहे असे जखमी मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील गोरेलाल चौक येथे जैन नामक व्यावसायिकाच्या दुकानाचे दुरूस्तीचे काम सुरू असताना नव्याने भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते. दरम्यान, घटनेच्या वेळी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असताना शेजारील दुकानाची जुनी भिंत व नव्याने बांधकाम सुरू असलेली भिंत दोन्ही अचानकच कोसळल्या. यावेळी त्याठिकाणी काम करत असलेले अक्षय व जितेंद्र हे दोन्ही मजूर भिंतीच्या मलब्याखाली दबले. प्रसंगी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही मलब्याबाहेर काढले. ज्यामध्ये अक्षय पाचे याचा जागीच मृत्यू तर जितेंद्र बाहे हा गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले.building collapses दरम्यान, जितेंद्र ला उपचारासाठी तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.