प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत लैगिक छळ करणार्‍या आरोपीस जन्मठेप

01 Oct 2025 20:24:43
वाशीम, 
love-affair-sexual-harassment : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष बाल संरक्षण प्रकरणामध्ये आरोपीस दोषी ठरवून त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाल लैगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
 
 

k l 
 
 
 
या प्रकरणातील पुरावे, शाळेचे दाखले, जात प्रमाणपत्र, पालकांची साक्ष आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे हे सिद्ध झाले की पीडिता त्या घटनेच्या वेळी केवळ १५ वर्षे २ महिने आणि १९ दिवसांची अल्पवयीन मुलगी होती. त्यामुळे कोणतीही संमती कायदेशीरदृष्टया ग्राह्य धरता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात पुढे नमूद केले आहे की, आरोपीस संपूर्ण माहिती असूनही त्याने जाणूनबुजून गुन्हा केला. आरोपी आणि पीडिता यांच्यात पूर्वीपासून परिचय आणि संवाद होता.
 
 
मात्र, न्यायालयाने अधोरेखित केले की, खरे प्रेम हे दुसर्‍याच्या सन्मानाचे आणि भविष्यातील कल्याणाचे रक्षण करणारे असते. तर वासना ही स्वार्थी, क्षणिक आणि विनाशकारी प्रवृत्ती असते. अल्पवयीनाबाबत प्रेम म्हणून केलेला कोणताही दावा कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरला जाऊ शकत नाही आणि असा कोणतेही कृत्य गंभीर गुन्हा ठरतो. आरोपीने पीडितेचे वय माहित असूनही गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. असे सांगत जिल्हा सत्र न्यायाधिशांनी यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणुन सुचिता कुळकर्णी यांनी काम बघितले. सदर गुन्ह्यचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे यांनी करुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते.
Powered By Sangraha 9.0