दिलासादायक... सरकारकडून क्रांती घडवणारे पाऊल!

01 Oct 2025 14:53:33
मुंबई,
MahaCare Foundation महाराष्ट्र सरकारने राज्यातील कर्करोग रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत ‘महाकेअर फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात येणार असून, राज्यभरातील १८ शासकीय रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 

MahaCare Foundation 
या नवीन MahaCare Foundation  आराखड्याअंतर्गत कर्करोग उपचार केंद्रांची त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या रचनेनुसार, एल-१, एल-२ आणि एल-३ अशा तीन पातळ्यांवर रुग्णसेवा दिली जाईल. एल-१ पातळीवर मुंबईतील टाटा स्मारक रुग्णालय हे प्रमुख केंद्र असेल, जे संशोधन आणि सर्वाधिक प्रगत उपचारांसाठी जबाबदार राहील. एल-२ पातळीवर राज्यातील आठ प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये निदान, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी तसेच वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तर एल-३ पातळीवरील नऊ रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार, स्थानिक पातळीवर जनजागृती आणि पॅलेटिव्ह केअरवर भर दिला जाणार आहे.
 
 
 
या योजनेच्या माध्यमातून केवळ उपचारच नव्हे, तर कर्करोगाच्या क्षेत्रात संशोधनालाही चालना दिली जाणार आहे. राज्यभरातील रुग्णांना त्यांच्या जवळच्या ठिकाणीच उपचार मिळावेत, यासाठी डे-केअर सेंटरची संख्या वाढवली जाणार आहे. याशिवाय, गंभीर रुग्णांसाठी मानसिक आणि शारीरिक आधार देणाऱ्या पॅलेटिव्ह केअर सुविधांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
 
 
‘महाकेअर फाऊंडेशन’ MahaCare Foundation  या नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थापन, निधी संकलन, मनुष्यबळ नियोजन आणि विविध केंद्रांमधील समन्वय साधला जाईल. सुरुवातीला १०० कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या शुल्कांपैकी २० टक्के निधी या फाऊंडेशनकडे वर्ग केला जाईल. याशिवाय, देणग्या, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि क्लिनिकल ट्रायल्सच्या माध्यमातूनही निधी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. एल-३ केंद्रांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि व्यवस्थापन सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात येईल. विशेष बाब म्हणजे, शिर्डी संस्थान रुग्णालयाचा खर्च संस्थान स्वतः उचलणार आहे.या योजनेसाठी एल-२ केंद्रांवर एकूण १,५२९.३८ कोटी रुपये तर एल-३ केंद्रांसाठी १४७.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘महाकेअर फाऊंडेशन’साठी सुरुवातीला १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
 
 
दर्जेदार आणि सुलभ उपचार
या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. वैद्यकीय शिक्षण, आरोग्य आणि वित्त विभागांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच कर्करोग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संचालक मंडळात असतील. तर आरोग्य क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे.या उपक्रमामुळे राज्यातील कर्करोग रुग्णांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे हे उपचार सामान्य नागरिकांनाही परवडणारे ठरणार आहेत. यासोबतच, नवीन संशोधन व उपचार पद्धतींना चालना मिळून कर्करोगावरील लढ्यात एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, असेच या योजनेचे चित्र सध्या दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0