मेट्रो सेवा उद्या रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार

01 Oct 2025 21:49:56
नागपूर,
Metro Nagpur : विजया दशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक बघता, मेट्रो सेवेत वाढ केली आहे. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी मेट्रो सेवा सकाळी ५ वाजतापासून तर रात्री १२ वाजतापर्यंत राहणार आहे. मेट्रोच्या चारही मार्गावर प्रवाशांना प्रवास करता येणार असून मेट्रोच्या खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, लोकमान्य नगर आणि प्रजापती नगर स्टेशन येथून मेट्रो सुटणार आहे.
 
 
jk
 
 
 
दसरा उत्सवासोबतच दीक्षाभूमीवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखो अनुयायी विविध भागातून दीक्षाभूमीवर येतात. विजया दशमीच्या निमित्ताने रावण दहण असेल किंवा दसर्‍याला भेटीगाठी, शहरभर नागरिकांची रेलचेल असते. विधान भवन चौक, नागलोक, कामठी रोड, ड्रॅगन पॅलेस, कामठी येथे भाविकांची गर्दी असते. या सगळ्याचा विचार करून मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ करण्यात आला आहे. रस्त्यावरिल वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी मेट्रो प्रवासाचा लाभ घ्यावा, आवाहन मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0