मंगरुळनाथ,
MLA Shyam Khode विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीने नुकसान केले आहे. कित्येक ठिकाणी शेतजमीन पूर्णपणे खरडून वाहून गेलेली आहे. आगस्ट महीन्याच्या मध्यात जो पाऊस सुरू झाला त्या पावसाने जवळजवळ २६ सप्टेंबर पर्यंत उघडीप घेतलीच नाही.
राज्यात कोठे ना कोठे ढगफुटीचा पाऊस सुरुच होता. त्यामुळे, शेतीचे अतोनात नुकसान झाले आणि ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे आमदार श्याम खोडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत एका महिन्याचे संपूर्ण वेतन शेतकर्यांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला व तो आचरणात देखील आणला आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजपा-महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या वतीने पूरग्रस्तांचे मदत व पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. भाजपा कार्यकर्ते देखील प्रशासनाला सहकार्य करत आहेत. भाजपा शेतकर्यांच्या नेहमी पाठीशी राहील अशी माहीती आ.श्याम खोडे यांनी दिली.
पूरग्रस्तांना दिलासा मिळेल,पिडीत पूरग्रस्तांचे जीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे या साठी दुर्गा मातेच्या चरणी साकडे घातले.वाशीम मंगरुळनाथ मतदार संघात अनेक आमदार निवडुन आले. परंतु शेतकरी हितासासाठी कोणीही पुढे आले नाही. आ.खोडेंच्या उदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.