नमो नेत्र शिबिर जनसेवेचा पवित्र यज्ञ: भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे

01 Oct 2025 21:22:43
बुलढाणा, 
vijayraj-shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा हीच राष्ट्रभक्ती ही शिकवण भाजपा कार्यकर्त्यांना दिली आहे. या शिबिरातून प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भारताची नवी दृष्टी जागवत आहे. भाजपाचे राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी आहे. या शिबिरातून सेवाभावाची नवी प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचतेय. नमो नेत्र शिबिर ही केवळ तपासणी शिबीर नाही तर जनसेवेचा एक पवित्र यज्ञ आहे. या संकल्पात आपण सर्वांनी सहभागी होऊन उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी हातभार लावूया असे आवाहन भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केले आहे.
 
 
 
kl
 
 
 
दि. १ ऑटोबर रोजी बुलढाणा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक नगर परिषद कार्यालय आरोग्य रक्षक मोफत नमो नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप, शिबिराचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते. माजी आ. विजयराज शिंदे यांनी शिबिराचे उदघाटन करून रुग्णांशी संवाद साधला. या शिवाय भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, भाजपचे अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बरदे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा सचिव डॉ मधुसूदन सावळे, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ राजेश्वर उबरहंडे यांची भाषणे झाली. शिबिरामध्ये जवळपास १९०० रुग्णांची नोंदणी झालेली होती. त्यातील १३०० रूग्णांना चष्मे घरपोच मिळणार आहे तर ३०० रुग्णावर नेत्ररुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. रुग्णांची नेत्र तपासणी होऊन त्यांना औषधी देण्यात आलेली आहे. शिबिराच्या यशस्वी नियोजना साठी भाजपा जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल, नगरसेवक अरविंद होंडे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष मोहम्मद अकिल यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिवन चित्र प्रदर्शनी
 
 
शिबिराच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारा चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली होती या चित्र प्रदर्शनीचे उपस्थित रुग्णांनी व नागरिकांनी अवलोकन केले.या शिबिरात जेष्ठ नेते प्रा जगदेवराव बाहेकर, विश्राम पवार, गणेश राजपूत,अनंता शिंदे, अण्णासाहेब पवार, सुभेदार अभिमन्यु करपे, अशोक किलबिले, इंगळे , किरण नाईक, विमल बेंडवाल, सिंधु खेडेकर, अल्का पाठक, उषा पवार, मुन्ना बेगाणी, वैभव इंगळे, सचिन टेंभीकर, प्रा प्रभाकर वारे, मिलिंद कुलकर्णी, करन बेंडवाल, अजित गुळवे, कुलदीप पवार, प्रदीप सोनटक्के मुकुंदा देशपांडे, संजय जुंबड, नितीन दासार,राजू खरात, गौरव राठोड, सचिन सूर्यवंशी ई भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. तसेच शिबिरासाठी जिल्हा आरोग्य विभागातील नोडल अधिकारी डॉ रवी शिंदे,डॉ तोडकर,डॉ अमोल उगले, डॉ भिलावलकर , नेत्र तज्ञ अविनाश चिंचोले, राजेंद्र देवकर फर्जना, गिरे सवडतकर यांनी विशेष सहकार्य केले
Powered By Sangraha 9.0