शहरात भक्तिमय वातावरणात नवरात्र संपन्न

01 Oct 2025 18:26:34
पांडुरंगेश्वर मंदिरात भजन
Navratri 2025दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर येथील पांडुरंगेश्वर शिव मंदिरात सख्यांनी भजन सादर केले. तबला व पेटीच्या सुरेल साथीने रंगलेल्या या भजनामुळे वातावरण भक्तिमय झाले.कार्यक्रमाची सुरुवात गणपती भजनाने झाली. त्यानंतर आईचा जोगवा आणि विविध देवी पदे सादर करण्यात आली. भजनानंतर सख्यांनी टिपरीवर फेर धरला व कन्या पूजन सोहळा पार पडला.नवरात्रातील या आठ दिवसांत दिनदयाल नगरीत अखंड भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले होते
 
 

१ ६  
 
.
सौजन्य: कल्पना वाराणशिवार,संपर्क मित्र
श्री शक्तिपीठ येथे "अष्टमी पूजा" संपन्न
श्री शक्तिपीठ, रामनगर आणि चित्पावन ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त महालक्ष्मी पूजन (अष्टमी पूजन) भक्तिभावाने पार पडले.परंपरेनुसार अश्विन शुद्ध अष्टमीला तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून तयार केलेल्या मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा केली जाते. Navratri 2025 यावेळी देवीसमोर “घागरी फुंकण्याचा” कार्यक्रमही उत्साहात साजरा झाला.या वर्षीच्या पूजेचे यजमानपद लिमये आणि केळकर कुटुंबीयांनी स्वीकारले. सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी पूजन झाले, तर सायंकाळी ६.३० वाजता आरतीनंतर घागरी फुंकण्याचा सोहळा झाला.या यशस्वी आयोजनासाठी श्री शक्तिपीठ रामनगर कार्यकारिणीतील स्मिता केळकर यांचे शिस्तबद्ध नियोजन आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य कौतुकास्पद ठरले. तसेच चित्पावन ब्राह्मण संघाच्या जुषा जोग व महिला कार्यकारिणी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक झाला.
 
 

ghagar  
 
 
 
सौजन्य :उमाकांत रानडे,संपर्क मित्र
 
 
Powered By Sangraha 9.0