अन् आ. बकाने स्वत:च वाढू लागले

01 Oct 2025 21:27:45
देवळी, 
Rajesh Bakane : आमदार देवळीचे आणि सेलूत काय करतात असा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. परंतु, देवाच्या पाया पडायला व्यती कुठेही जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी बोरधरण परिसरात असलेल्या भोंडाई मातेने कौल दिला होता. आज महानवमीनिमित्त देवळीचे आ. राजेश बकाने यांनी भोंडाई माता मंदिरात महापूजा करून अन्नदान केले. यावेळी आ. बकाने यांना पंगतीत वाढण्याचा मोह आवरला नाही.
 
 
 jk
 
सेलू तालुयातील भोंडाई माता देवस्थान जागृत देवस्थान आहे. येथे राजेश बकाने नेहमी दर्शनासाठी जातात. देवीचे अनेक अनुभव आल्याने बकाने यांचा देवीवर विश्वास अजून दृढ होत गेला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या नवरात्रात बकाने यांना देवीने कौलही दिला होता.
 
 
सेलू तालुयातील बोरधरण येथील जागृत देवस्थान भोंडाई माता मंदिरात महानवमी निमित्त आयोजित कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भोंडाई मातेच्या दर्शनाला येणारा भत कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही ही श्रद्धा भाविकांमध्ये असल्यामुळे या महोत्सवाला दरवर्षी भव्य स्वरूप लाभते. या वर्षीही होमहवन, देवी पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आ. राजेश बकाने यहंनी देवीचे दर्शन घेतले. महाप्रसादाच्या पंगतीत बसलेल्या भाविकांना त्यांनी स्वतः हाताने जेवण वाढले. सामान्य नागरिकांप्रमाणे जमिनीवर बसून त्यांनी भतांची सेवा केली.
 
 
आ. राजेश बकाने म्हणाले की, भोंडाई मातेचे दर्शन पुरेसे नाही तर भतांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. हीच खरी देवीभक्ती आहे. आपल्या कुटुंबावर भोंडाई मातेची अपरंपार कृपा आहे. तिच्या आशीर्वादामुळेच आपल्याला जनसेवेचे भाग्य लाभले आहे. या मंदिराचा विकास, येथील सोयीसुविधांचा विस्तार करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
भोंडाई माता देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनीही यावेळी आ. बकाने यांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0